ETV Bharat / bharat

जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसचं पारडं जड, कुणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झिट पोल - Jammu Kashmir Exit Poll Result - JAMMU KASHMIR EXIT POLL RESULT

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोल जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापना करेल, असा अंदाज आहे.

jammu kashmir assembly election exit poll 2024 congress bjp
जम्मू आणि काश्मीर एक्झिट पोल निकाल (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 9:45 AM IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक जण विधानसभा निवडणूक निकालाची (Jammu Kashmir Assembly Election)आतुरतेनं वाट पाहतंय. याचं कारण म्हणजे, इथं 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या असून दुसरं म्हणजे जम्मू-काश्मीरला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. तर जम्मू आणि काश्मीरसाठी एक्झिट पोलचे निकाल (Jammu Kashmir Exit Poll Result) काय सांगतात ते जाणून घेऊया.

  • 'ॲक्सिस माय इंडिया'चा एक्झिट पोल : ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या निकालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युतीला 35-45 जागा मिळतील. तर भाजपाला 24-34 जागा मिळू शकतात. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपीला 4-6 जागा मिळतील. इंजिनियर रशीद यांच्या एआयपी पक्षाला 3-8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
  • 'पीपल्स पल्स'चा एक्झिट पोल : 'पीपल्स पल्स'च्या एक्झिट पोलनुसार, नॅशनल कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीरमध्ये 33-35 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीला 46-50 जागा मिळण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरसाठी 'पीपल्स पल्स'चा अंदाज

  • राष्ट्रीय परिषद - 33-35
  • भाजपा - 23-27
  • काँग्रेस - 13-15
  • पीडीपी - 7-11
  • इतर - 4-5
  • इंडिया टुडे-सी-व्होटर एक्झिट पोल परिणाम : इंडिया टुडे आणि सी-व्होटर एक्झिट पोल डेटानुसार, भाजपाला जम्मू विभागातील 43 जागांपैकी 27-31 जागा मिळू शकतात. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 11-15 तर पीडीपीला दोन जागा मिळू शकतात.

जम्मू-काश्मीरसाठी इंडिया टुडे-सी-व्होटरचा अंदाज :

  • काँग्रेस+एनसी - 40-48
  • भाजपा - 27-32
  • पीडीपी – ६-१२
  • इतर - 6-11

मॅट्रिक्स एक्झिट पोल :

  • काँग्रेस+एनसी - 28-30
  • भाजप - 28-30
  • पीडीपी -05-07
  • इतर -08-16

हेही वाचा -

  1. भाजपाला मोठा धक्का; हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार, 'एक्झिट पोल'चे आकडे आले समोर - Haryana Exit Poll Result

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.