ETV Bharat / state

राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं सप्तश्रृंगी देवीचं दर्शन, नाशिकचा गड पुन्हा काबीज करणार? - Raj Thackeray - RAJ THACKERAY

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी सहकुटुंब सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Raj Thackeray In Nashik
राज ठाकरेंनी घेतलं सप्तश्रृंगी मातेचं दर्शन (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 10:58 AM IST

Updated : Oct 6, 2024, 11:50 AM IST

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून सप्तश्रृंगी मातेची ओळख आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सप्तशृंगी गडावर जाऊन 'सप्तशृंगी मातेचं' दर्शन घेतलं. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. दरवर्षी राज ठाकरे दर्शनासाठी सहकुटुंब येतात.

47 मतदारसंघाचा घेणार आढावा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळं त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. राज्यातील सर्वच 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. अशात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. मराठवाड्यातील दौऱ्यानंतर राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघाचा आढावा घेणार असून उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नाशिकचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी राज ठाकरेंच्या या दौऱ्यात रणनीती आखली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

राज ठाकरेंनी घेतलं सप्तश्रृंगी मातेचं दर्शन (Source - ETV Bharat Reporter)

राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम : राज ठाकरे यांचे सुरूवातीपासून नाशिकवर विशेष प्रेम आहे. मनसेच्या सत्ता काळात नाशिकचा विकास झाला. त्यात वाहत्या पाण्यावरील शंभर फुटी कारांजा, बॉटनिकल गार्डन, होळकर पुलावरील वॉटर कर्टन, शहरातील रिंग रोड या सारखी अनेक कामे झाली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या निधीचा महानगरपालिकेवर भार न पडू सीएसआर निधीतून ही कामे राज ठाकरे यांनी केली असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

पक्ष पुनर्जीवित करण्याची संधी : सध्याच्या स्थितीमध्ये अनेक प्रमुख नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाशिकमध्ये कमी झाली असून संपलेली नाही. त्यामुळं पुन्हा स्वबळाचा नारा देत पक्षाला पुनर्जीवित करण्याची संधी राज ठाकरेंकडं आहे, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी काही महिन्यांपासून अमित ठाकरे यांच्यावर नाशिकमधील पक्ष संघटन बळकट करण्याची जबाबदारी सोपवली आहे. नाशिक शहरात मनसेचा इतिहास बघितला तर 2009 मध्ये मनसेचे तीन आमदार 2012 मध्ये नाशिक महापालिकेवर तब्बल 40 नगरसेवक निवडून देत महानगरपालिकेची सत्ता नाशिककरांनी राज ठाकरे यांना देऊ केली होती. तेच दिवस पुन्हा आणण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकवर विशेष लक्ष केंद्रित केलंय.

हेही वाचा -

  1. 'लाडकी बहीण योजने'वरुन राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "ही योजना बंद..." - Ladki Bahin Yojana
  2. विधानसभेचा 'फड' गाजवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसे देणार उमेदवार; नावही ठरलं - MNS Vs Devendra Fadnavis
  3. गांधी जयंती निमित्त राज ठाकरे यांचा वाचाळ वीरांना टोला - Raj Thackeray

Last Updated : Oct 6, 2024, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.