ETV Bharat / state

Satara Company Fire : साताऱ्याजवळ प्लास्टिक रिसायकल करणाऱ्या कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली - सातारा प्लास्टिक कंपनी आग

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा येथून पाली-सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल ( Amazia Vision Environmental Fire ) ही कंपनी आहे. या कंपनीत भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग ( Plastic Recycling Company Fire ) केले जाते. रविवारी दुपारी या कंपनीस मोठी आग लागली.

Satara Amazia Vision Environmental Fire
Satara Amazia Vision Environmental Fire
author img

By

Published : Feb 8, 2022, 2:00 AM IST

सातारा : तालुक्यातील समर्थगावजवळ असलेल्या भंगारातील प्लास्टिकचे रिसायकलिंग ( Plastic Recycling Company Fire ) करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत कंपनीचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुट्टीमुळे लवकर कळले नाही -

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा येथून पाली-सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल ही कंपनी आहे. या कंपनीत भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग केले जाते. रविवारी दुपारी या कंपनीस मोठी आग लागली. रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही नव्हते. त्यामुळे आग लागलेली लवकर लक्षात आली नाही. वाऱ्यामुळे आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले. धुरांचे लोट सुमारे १५ किलोमीटरच्या परिघात लांबून दिसत होते.ॉ

मोठे आर्थिक नुकसान -

सातारा नगरपालिका, कराड नगरपालिका, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशामन दलाच्या गाड्याही तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. या आगीत प्लास्टिकच्या कच्च्या मालाबरोबरच तयार माल व यंत्रसामुग्रीसह कंपनीचे संपूर्ण मेन शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

हेही वाचा - PM Modi Criticizes Congress : पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, मुंबईतील कोरोना बिहार-उत्तर प्रदेशात पसरवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.