सातारा - मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
फलटणचे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे गावात आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचं पुढे काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुवाबाजीला मी तीव्र विरोध करतो. श्रद्धा असली पाहिजे, त्यात दुमत नाही; पण अंधश्रद्धा नको. श्रद्धेचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी समाज. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे पवार म्हणाले.
-
मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नाही. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना तिथं किंमत नाही. पवार साहेब सभेवेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान द्यायचे. pic.twitter.com/fsKyg9qFwv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नाही. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना तिथं किंमत नाही. पवार साहेब सभेवेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान द्यायचे. pic.twitter.com/fsKyg9qFwv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 12, 2019मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नाही. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना तिथं किंमत नाही. पवार साहेब सभेवेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान द्यायचे. pic.twitter.com/fsKyg9qFwv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 12, 2019
हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य
हेही वाचा - 'विरोधक आता थकलेत, त्यांना उभं राहायलाही आधार लागतोय'
विरोधक नाहीत तर सभा घेता कशाला
मला सरकार बदलायचंय", अशी भूमिका शरद पवारसाहेबांनी घेतल्यानेच महाराष्ट्रात पंतप्रधानांना १० सभा, अमित शहांना २० सभा, मुख्यमंत्र्यांना १०० सभा घ्याव्या लागत आहेत. तरीही म्हणतात, 'आम्हाला विरोधकच नाहीत' अरे, विरोधकच नाही, तर सभा गेता कशाला? असा सवालही त्यांनी केला.
बाहेरचे लोक इकडे येऊन विचारतात, पवारसाहेबांनी काय केलं? पवारसाहेबांनी अन्न-धान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण केले. कुठे एमआयडीसी सुरु करायची, कुठे पाण्याचा प्रश्न सोडवायचा, शिक्षणाची सोय करायची, हे करत देशाला आणि राज्याला पुढे नेण्याचे काम साहेबांनी केल्याचे अजित पवार म्हणाले.