ETV Bharat / state

Aditya Thackeray on rebel MLA : अपचन झाल्याने हाजमोला खायला गद्दार पलिकडे गेले, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला

गद्दारांना लायकीपेक्षा जास्त मिळाले. त्यामुळे, अपचन झाल्याने ते हाजमोला खायला तिकडे गेले असावेत, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते ( Aditya Thackeray hajmola comment on rebel MLA ) आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला. थोडी जरी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान त्यांनी ( Aditya Thackeray challenge MLA Shambhuraj Desai ) पाटणचे आमदार शंभूराज देसाईंना दिले.

Etv BharatAditya Thackeray hajmola comment on rebel MLA
Etv Bharatआदित्य ठाकरे हाजमोला टोला सातारा
author img

By

Published : Aug 3, 2022, 7:41 AM IST

सातारा - शिवसेना फोडून ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचे प्रयत्न गद्दारांकडून ( Aditya Thackeray hajmola comment on rebel MLA ) सुरू आहेत. परंतु, ते शिवसेना संपवू शकत नाहीत. कारण शिवसैनिक ( Aditya Thackeray on rebel MLA in satara ) आमच्या पाठीशी आहेत. गद्दारांना लायकीपेक्षा जास्त मिळाले. त्यामुळे, अपचन झाल्याने ते हाजमोला खायला तिकडे गेले असावेत, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला. थोडी जरी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान त्यांनी ( Aditya Thackeray challenge MLA Shambhuraj Desai ) पाटणचे आमदार शंभूराज देसाईंना दिले.

बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे

हेही वाचा - सातार्‍याचे सुपूत्र, माजी न्यायमूर्ती रणजित मोरे यांची कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती

शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल - शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात काल बंडखोर आमदारांचा जोरदार समाचार घेतला. बंडखोरांनी केवळ शिवसेनेबरोबरच नव्हे तर उद्धव साहेबांबरोबर देखील गद्दारी केली आहे. ही माणूसकीसोबतची गद्दारी आहे. अशा गद्दारीला आपण पाठबळ देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला.

लायकीपेक्षा जास्त देऊन चूक केली का? - ज्या शिवसेनेने ओळख, सत्ता आणि पदे दिलीत त्याच शिवसेनेशी यांनी गद्दारी केली. आमची काय चूक झाली? लायकीपेक्षा जास्त दिले, हीच चूक झाली का? मागील चाळीस वर्षांत मुख्यमंत्र्यांनी जी खाती अन्य मंत्र्यांना दिली नव्हती ती खातीदेखील त्यांना दिली. ज्या पक्षप्रमुखांनी सर्व काही दिले त्यांची प्रकृती ठीक नसताना साथ द्यायचे सोडून यांनी फोडाफोडी केल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

सत्तेत आल्यावर पहिला निर्णय रायगडाचा - सत्तेवर आल्यानंतर रायगडासाठी 600 कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला, तर शेवटचा निर्णय संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा घेतला. उद्धव ठाकरे हे मेन स्ट्रीममध्ये येताहेत, हेच या गद्दारांचे मूळ दुखणे असेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सामान्यांचे प्रेम हीच आमची ताकद - मी आज महाराष्ट्र फिरत आहे. त्यावेळी सर्वत्र मला जे प्रेम मिळत आहे, हीच आमची ताकद आहे आणि सामान्य जनता हेच आमचे कुटुंब आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मी आज तुमचे आशीर्वाद मागायला आलो असल्याचे भावनिक आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा - गद्दारांच्या मनात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना दिले. याआधी देखील महाराष्ट्रात बंडखोऱ्या झाल्या, पण पक्ष बदलताना किमान ते राजीनामा देऊन जायचे, याची आठवणही करून देत जनतेने 'सत्तामय जयतेपेक्षा सत्यमेव जयते'च्या बाजूने उभे राहाण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

हेही वाचा - Udayanraje Bhosle criticize Governor: महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल, तर राज्यपालांनी दुसर्‍या राज्यात जावे - उदयनराजे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.