ETV Bharat / state

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी देशी पिस्तुलासह जेरबंद - karad police news

मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आणि एक वर्षापासन फरार असलेला अट्टल गुन्हेगार अभिजीत दत्तात्रय विभुते यास कराड ग्रामीण पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकररण शाखेने देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे.

आरोपी व पोलीस पथक
आरोपी व पोलीस पथक
author img

By

Published : Nov 21, 2020, 10:23 PM IST

कराड (सातारा) - मोक्का गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अभिजीत दत्तात्रय विभुते (रा. कालेटेक, ता. कराड) यास कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने देशी बनावटीच्या पिस्तुलासह ताब्यात घेऊन अटक केली.

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अभिजीत विभुते याच्यावर वर्षभरापूर्वी मोक्काचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तो फरारी होऊन पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता. शनिवारी (दि. 21 नोव्हेंबर) तो काले-नारायणवाडी परिसरात येणार असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी अभिजीत विभुते यास जेरबंद केले. तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते पिस्तूल जप्त करून विभुते यास अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.