सातारा - भरधाव वेगाने साताऱ्याहून वाईकडे जाणाऱ्या मोटारीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. बावधन ओढा या परिसरात हा अपघात घडला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला असून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
समोरासमोर अपघात
प्रवीण भोसले हे आपल्या पत्नी वनितासह दुचाकीवरून वाईला किसन वीर महाविद्यालयात पुस्तके आणण्यासाठी गेले होते. प्रवीण गाडी चालवत होते. तेथील काम झाल्याने परत सातारच्या दिशेने येत होते. बावधन ओढ्याजवळ दोनच्या सुमारास मोटारीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्यात वनिता व प्रवीण हे दोघेही दुचाकीवरून फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. वनिता या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. याबाबत वनिता प्रवीण भोसले यांनी फिर्याद दिली.
हेही वाचा - नळ जोडणीत उरण तालुका राज्यात प्रथम