सातारा - पाटण कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने ओढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री कार दरीत पडून पाण्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोयनानगर जवळ असलेल्या हुंबरळी (ता.पाटण) येथील पाबळनाला या ठिकाणी रात्री गाडी चालकाला पाण्यामुळे अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार दोनशे फूट धबधब्यात कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
नितीन शेलार (रा.सातारा) याच्यासह अन्य एकाचा या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले आहे. यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. सातारा येथून आमदार शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स व बचाव पथक कोयनानगरमध्ये दाखल झाली आहे. मुसळधार पावसात शोधमोहीम सुरू आहे.