सातारा : सातार्यातील (Satara Crime) पाटण शहरातून किरकोळ विक्रेत्याच्या खुनाची घटना समोर आली आहे. अज्ञाताने डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केला आहे. रमण तेवर (वय ५२) असे खून झालेल्या विक्रेत्याचे (A salesman was killed) नाव असून;तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी होता. या प्रकरणी पाटण पोलिसांनी (police investigation started in satara) तपास सुरू केला आहे.
सातार्यातील पाटण शहरातून किरकोळ विक्रेत्याच्या खुनाची घटना समोर आली आहे. अज्ञाताने डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केला आहे. रमण तेवर (वय ५२) असे खून झालेल्या विक्रेत्याचे नाव असून; तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी होता. तो गोळ्या-बिस्किटे विक्रीचा व्यवसाय करत होता. या प्रकरणी पाटण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राहत्या शेडमध्ये आढळला मृतदेह : पाटण शहरातील, संत निरंकार भवन शेजारील इमारतीमागे रमण तेवर हा अनेक वर्षापासून कुटुंबासह भाड्याने राहत होता. गेली अनेक वर्षे तो पाटणसह परिसरात गोळ्या-बिस्किटे विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यातून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होता. आज सकाळी निरंकार भवनाशेजारील इमारतीच्या, पाठीमागील शेडमध्ये खून झाला; असल्याची माहिती मिळताच पाटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रमण याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करुन; त्याच्या अंगावर सामानाचे पोते ठेवल्याचे आढळून आले.
पत्नी आहे तामिळनाडूत : मृत रमण याची पत्नी दोन दिवसांपूर्वी, आपल्या मूळ गावी (तामिळनाडू) गेली आहे. रमणला दोन अविवाहित मुले, तर दोन विवाहित मुली आहेत. खुनाच्या घटनेची बातमी वार्यासारखी पाटण शहरात पसरल्यानंतर, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पाटण पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : Nagpur Murder News : नागपुरात भररस्त्यात खून; आरोपी मृतदेहाचा फोटो काढून पसार