ETV Bharat / state

शालेय मुलीवर अत्याचार करणारा संशयित म्हसवड पोलिसांच्या ताब्यात - सातारा पोलिस

म्हसवड येथे १० वर्षीय मुलीवर अज्ञाताने पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतीत म्हसवड पोलिसांनी माहितीगारांच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

संशयीत आरोपीचे रेखाचित्र
author img

By

Published : Jul 3, 2019, 10:43 PM IST

सातारा - म्हसवड येथे १० वर्षीय मुलीवर अज्ञाताने पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या लहान भावंडाना या प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. याबाबतीत म्हसवड पोलिसांनी माहितीगारांच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

संशयीत आरोपीचे रेखाचित्र

म्हसवड येथे काल शाळा सुटल्यानंतर १० वर्षीय मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने अज्ञाताने आपल्या दुचाकीवर बसविले होते. त्यानंतर मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता. नंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या लहान भावंडांना या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला होता. हा सर्व प्रकार सातारा पोलिसांना माहिती झाल्यावर त्यांनी मुलीला याबद्दल विचारणा केली व तीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते.

सातारा पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार करुन म्हसवड पोलिसांकडे दिले होते. त्यानंतर म्हसवड पोलिसांनी ते रेखाचित्र काही माहितगारांकडे दिले व ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांना विरकरवाडी येथे एक तरुण संशयीतरित्या फिरताना आढळून आल्याने स.पो.नि. देशमुख यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पाडितेच्या लहान बहिणीला संशयिताच्या समोर उभे केले असता त्या चिमुरडीने आपल्याला यानेच गाडीवर बसवून नेले असून त्यानेच दमबाजी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. यावरुन पोलिसांनी त्याला त्वरित अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या खळबळजनक घटनेमुळे म्हसवडचे नागरिक संतापले असून त्यांनी या घटनेच्या निषेधार्त उद्या म्हसवड बंद ची हाक दिली आहे. संपूर्ण शहरवासियांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:सातारा: (ता.माण) म्हसवड येथे काल शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका १० वर्षीय बालिकेला घरी सोडण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने आपल्या दुचाकीवरुन निर्जन स्थळी नेहुन तिच्यावर पाशवी बलात्कार करुन तिच्यासोबत असलेल्या लहान भावंडाना हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देवुन पलायन केलेल्या अज्ञाताचा पोलीसांकडुन तपास चालू होता. शालेय बालिकेवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीचे संबधीत अत्याचारीत मुलीने सांगीतलेल्या वर्णनानुसार सातारा पोलीसांनी त्याचे रेखाचित्र तयार करुन म्हसवड पोलीसांकडे दिल्यावर पोलीसांनी ते रेखाचित्र काही माहितगारांकडे दिल्यावर त्या अधारे आज संशयीत एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडे याबाबत कसुन चौकशी सुरु केली आहे . तर संबधीत अत्याचारीत मुलीच्या लहान बहिणीने त्या संशयीतास ओळखले असल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.

Body:दरम्यान पोलीसांकडुन प्रसिद्ध करण्यात आलेले संशयीत आरोपीचे रेखाचित्र शहरात सोशल मिडीयावर जोरात व्हायरल झाल्याने अनेकांनी याविषयी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली असतानाच पोलीसांना विरकरवाडी येथील एक तरुण संशयीतरित्या फिरताना आढळुन आल्याने स.पो.नि. देशमुख यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले व संबधीत अत्याचारीत मुलीच्या लहाण बहिणीस त्याठिकाणी बोलावुन घेत संशयीताच्या समोर उभे केले असता त्या चिमुरडीने आपल्याला यानेच गाडीवर बसवुन नेले असुन त्यानेच दमबाजी केली असल्याचे पोलीसांना सांगितले, चिमुरडीने संशयीतास ओळखले असल्याने पोलीसांनी त्याला त्वरित अटक करुन त्याची वैद्यकिय तपासणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करुन त्याला त्याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले.

या घटनेच्या निषेधार्त उद्या म्हसवडकर नागरीकांच्या वतीने म्हसवड बंद ची हाक देण्यात आली असुन सर्व शहरवासीयांनी या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.