सातारा - दुष्काळी असा शिक्का असलेल्या माण तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसामुळे गोंदवल्यातील मोदळ ओढा दुथडी भरून वाहत आहे. गुरूवारी दुपारी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने समाधी मंदिरालगतचा बंधारा फुटला. त्यामुळे मंदिर परिसराची संरक्षक भिंतही पडली आहे.
हेही वाचा - केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र; पाटील, तावडेंसह पंकजा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट?
सकाळी पावसाला पुन्हा सुरुवात झाली. बंधारा फुटल्याने त्यातील पाणी दहिवाडी रस्त्यावर आले. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद झाली होती. तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माणगंगा नदीला देखील पाणी आले आहे.