ETV Bharat / state

25 लाखाच्या खंडणी प्रकरणी मुलाची हत्या, आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी - खंडणी प्रकरणी मुलाची हत्या

शहरातील नागठाणे (आष्टा) येथे एका मुलाची अपहरण करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तीन्ही आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

A child has been killed in Nagathane, accused arrested

author img

By

Published : Feb 23, 2020, 5:49 AM IST

सातारा - शहरातील नागठाणे (आष्टा) येथे एका मुलाची अपहरण करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन जणांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

25 लाखाच्या खंडणी प्रकरणी मुलाची हत्या, आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी

तेजस विजय जाधव (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. मुलाचे अपहरण झाल्यानंतर त्याचे वडील विजय जाधव यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. आरोपींनी विजय जाधव यांना 25 लाखाची खंडणी मागितली होती. तक्रार दाखल केल्यानंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या.

पोलिसांच्या पथकाने शिताफीने तपास करत आरोपी आशिष बन्सी साळुंखे (वय 29, रा. नागठाणे, ता. जि. सातारा), साहिल रुस्तुम शिकलगार (वय 25,रा. नागठाणे, ता. जि. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय 30,रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना अटक केली. दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तीन्ही आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.