ETV Bharat / state

स्वत:च्याच घरातील 35 तोळ्याचे दागिने चोरणार्‍या मुलास पोलिसांनी चोवीस तासात केले गजाआड - कराड पोलीस बातमी

चोरीच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या कुटुंबीयांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. चोरी करणारा संशयीत घरातीलच व्यक्ती असावा, असा पोलिसांना संशय आला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला धागेदोरे मिळाले. त्या आधारे तक्रारदाराचा मुलगा तेजस देशमुख याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेऊन मायणी पोलीस चौकीत नेले. त्याठिकाणी उपनिरीक्षक शीतल पालेकर या चौकशी करत असताना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

a boy who stole 35 tolas worth of jewelry from a house was nabbed by the police within 24 hours at karad in satara
35 तोळ्याचे दागिने चोरणार्‍या मुलास पोलिसांनी चोवीस तासात केले गजाआड
author img

By

Published : Jul 17, 2022, 2:54 PM IST

कराड (सातारा) - शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत अर्थिक नुकसान झाल्यामुळे मुलाने स्वत:च्याच घरातील 35 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार खटाव तालुक्यातील कातरखटाव गावातील चोरीच्या घटनेमध्ये समोर आला आहे. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तेजस तानाजी देशमुख यास पोलिसांनी अटक केली आहे. कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी कौशल्य पणाला लावून चोरीच्या घटनेचा पर्दाफाश केल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचे कौतुक केले.

जबरी चोरीमुळे खटाव परिसर हादरला - कातरखटाव गावातील तानाजी देशमुख यांच्या घरातून शुक्रवारी (दि. 15) भरदिवसा 35 तोळ्याचे सोने आणि 30 हजाराची रोकड चोरीस गेल्याचा प्रकार निदर्शनास आला. भरवस्तीतील घरात धाडसी चोरी झाल्यामुळे संपूर्ण कातरखटाव गाव हादरून गेले. सारिका तानाजी देशमुख यांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोबतच श्वानपथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही दाखल झाले. मात्र, घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान स्विकारत स्थानिक गुन्हे शाखेसह वडूज पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून तपासाला सुरूवात केली.

कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलिसांचा संशय बळावला - चोरीच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या कुटुंबीयांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. चोरी करणारा संशयीत घरातीलच व्यक्ती असावा, असा पोलिसांना संशय आला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला धागेदोरे मिळाले. त्या आधारे तक्रारदाराचा मुलगा तेजस देशमुख याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेऊन मायणी पोलीस चौकीत नेले. त्याठिकाणी उपनिरीक्षक शीतल पालेकर या चौकशी करत असताना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. मित्राच्या साथीने शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत अर्थिक नुकसान झाल्याने चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कौशल्याने केलेल्या तपासामुळे चोरीच्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पोलिसांचे कौतुक - भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा कौशल्याने तपास करून चोवीस तासात संशयीताच्या मुसक्या आवळल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, दहिवडी, वडूज पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोलीस निरीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.