सातारा - गोटे (ता. कराड) येथील फरहान उर्फ अबु हा बकरीला चारा ( Goat fodder) आणण्यासाठी मित्रासोबत मुंढे शिवारात गेला होता. झाडाचा पाला कोयत्याने काढत असताना लोखंडी कोयत्याचा(Iron sickle) विद्युत तारेला स्पर्श झाल्याने फरहानला वीजेचा जबर शॉक लागून त्याच्या हातातील कोयता बाजुला फेकला गेला आणि तो देखील खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू (Death on the spot)झाला.या घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुखा:चा डोंगर पसरले आहे.
झाडाच्या फांद्यामुळे झाला घात-उंबराच्या झाडाला शिडी लावून फरहान झाडावर चढला होता. झाडाच्या फांद्यांमुळे त्याला वीजेची तार दिसली नाही. तो खाली पडल्यानंतर त्याच्या बरोबर गेलेल्या मुलाने ही माहिती नागरीकांना दिली. नागरीकांनी त्याला तातडीने रूग्णालयात घेऊन गेले असता. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी (Power Distribution Company Officer) , कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गोटे अणि मुंढे गावावर( Mundhe village) शोककळा पसरली आहे.