सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 856 नविन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 16 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली. काल तालुक्यात सर्वाधिक 174 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.
साताऱ्यात काल सर्वाधिक रुग्ण
काल सातारा तालुक्यात सर्वाधिक 174 रुग्ण आढळले आहेत. तर जावळीत - 41, कराड- 166, खंडाळा- 30, सातारा- 174, कोरेगाव- 60, माण- 54, महाबळेश्वर- 13, पाटण- 58, फलटण- 73, वाई- 26 व इतर- 10 असे तालुकानिहाय कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. काल अखेर एकूण 1 लाख 80 हजार 607 नागरिकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 7 हजार 843 नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 856 रुग्ण कोरोनाबाधित निघाले आहेत.
10 हजार 708 सक्रीय रुग्ण
काल मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये कराड- 5, कोरेगाव- 3, खटाव- 1, सातारा- 6, पाटण- 1 या गावांचा समावेश आहे. कालपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 10 हजार 708 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
738 नागरिकांना डिस्चार्ज
काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या 738 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. काल अखेर 1 लाख 65 हजार 945 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
हेही वाचा - मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ सुरूच