ETV Bharat / state

Satara Accident : साताऱ्यात चार दिवसांत तीन अपघात; ८ ठार, ५ गंभीर जखमी - सातारा अपघात होवून 8 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या तीन भीषण अपघातात ८ जण ठार आणि ५ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे कोरेगाव, माण आणि पाटण, तर जखमी वाई तालुक्यातील आहेत. या तिन्ही अपघातातील मृतांमध्ये पाच वृद्ध आणि तीन तरूणांचा समावेश आहे.

सातारा अपघात
सातारा अपघात
author img

By

Published : Aug 3, 2022, 6:42 PM IST

सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या तीन भीषण अपघातात ८ जण ठार आणि ५ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे कोरेगाव, माण आणि पाटण, तर जखमी वाई तालुक्यातील आहेत. या तिन्ही अपघातातील मृतांमध्ये पाच वृद्ध आणि तीन तरूणांचा समावेश आहे. रस्त्यातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने इर्टिका कार झाडाला धडकल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 31 जुलै) रात्री दहाच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील सुर्ली गावच्या हद्दीत घडली. सातारहून कोरेगावकडे जात असताना हा अपघात झाला होता. अपघातात तुकाराम आबाजी माने (वय 65), तानाजी अनंत माने (वय 62) आणि सुभाष गणपत माने (वय 60) यांचा जागीच मृत्यू झाला.

कार-मोटरसायकल अपघातात तीन तरूण जागीच ठार : सातारा-पंढरपुर महामार्गावर गोंदवले खुर्द हद्दीत स्विफ्ट कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील तिन्ही तरूण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले. मंगळवारी (दि. २) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरूण हे पळशी (ता. माण) येथील होते. तुषार लक्ष्मण खाडे वय ( वय २२ ), अजित विजयकुमार खाडे वय (वय २३ ) आणि महेंद्र शंकर गौड (वय २१ ), अशी मृतांची नावे आहेत. स्विफ्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे आणि आनंदराव ढेंबरे हे गंभीररित्या जखमी झाले, तर ५ वर्षांचा नातू विहान हा आश्चर्यकारकरित्या अपघातातून बचावला.

टेम्पोला कारची धडक : पुणे-बंगळुरू महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत रस्त्याकडेला थांबलेल्या मालवाहू टेंपोला भरधाव वॅगन आर कारने पाठीमागून धडक दिल्याने कारमधील वृद्ध दापत्य जागीच ठार झाले. धोंडिबा केशव साळुंखे (वय 67) आणि त्यांच्या पती लक्ष्मी धोंडिबा साळुंखे (वय 61, हल्ली रा. घणसोली, नवी मुंबई, मूळ रा. ढेबेवाडी, ता. पाटण), अशी मृतांची नावे आहेत. माधुरी रमेश साळुंखे (मूळ रा. ढेबेवाडी, ता. पाटण, हल्ली रा. घणसोली), मच्छिंद्र किसन जाधव (वय 34), पत्नी तनुजा मच्छिंद्र जाधव (वय 32), मुलगा तनुज मच्छिंद्र जाधव (वय अडीच वर्षे, हल्ली रा. कोपरखैरणे, नवी मुंबई, मूळ रा. अंगुडेवाड़ी, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले आहेत. षष्ठीनिमित्त देवदर्शनासाठी जोतिबाला जात असताना हा भीषण अपघात झाला. भंगार घेऊन किर्लोस्करवाडीला निघालेल्या टेम्पोचा टायर पंक्चर झाल्याने टेम्पो रस्त्याकडेला थांबला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेली कार टेम्पोखाली घुसली.

हेही वाचा - Mob Lynching : गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.