सातारा - जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल 77 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर 2 हजार 783 नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 191 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 68 हजार 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात 14 हजार 240 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण 84 हजार 497 जणांना लागण झाली आहे. मृतांमध्ये सदरबझार येथील 3, माची पेठ, केसकर कॉलनी, मोरे कॉलनी, दौलत नगर, संभाजीनगर, शनिवार पेठ, रामाचागोट, कामाठीपुरा, नागठाणे, क्षेत्र माहुली-संगम माहुली, बोरगाव, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव शहर येथील प्रत्येकी 3 रुग्ण, एकंबे, मोहितेवाडी, चिंचळी, नायगाव, बोरगाव, किरोली तसेच फलटण तालुक्यातील फलटण शहर येथील तीन जणांचा समावेश आहे.
जावळी तालुक्यातील बिभवी, कुडाळ येथील दोन जणांचा, खटाव तालुक्यातील लोण, गोरेगाव, औंध येथील दोन जणांचा समावेश आहे. तसेच कानरवाडी, राजापूर, अंबवडे, फडतरवाडी बु,
काळेवाडी, पाटण तालुक्यातील तारळे, चव्हाणवाडी, हेळवाक, खंडाळा तालुक्यातील असवली, शिवाजीनगर तसेच इतर जिल्ह्यातील हिंगणगाव, वाणेवाडी, नाशिक, वाटेगाव ता. तासगाव सांगली, पुणे, कल्याण, मुंबई अशा एकूण 77 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.