सातारा - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होण्याची चिन्हे आहेत. आज जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला 19 वर्षीय युवक बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली.
जावळी तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचा हा युवक निकट रहवासी आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्याचा अहवाल मिळाला. त्यात तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले. परदेशवारी करुन आलेला युवक व जिल्ह्याबाहेरुन आलेल्या सात जणांना ताप, सर्दी व खोकला श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे कोरोना संशयित रुग्ण म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. याबाबतची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आज सायंकाळ अखेर जिल्ह्यातील 'कोरोना' बाबतची स्थिती
1. जिल्हा शासकीय रुग्णालय- 197
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 163
3. खाजगी हॉस्पीटल- 4
4. एकूण दाखल - 364
5. कोरोना बाधित अहवाल - 6
6. मृत्यू 1
7. डिस्चार्ज दिलेले- 309
8. सद्यस्थितीत दाखल- 54