ETV Bharat / state

साताऱ्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 20 जखमी

पुण्यावरून बंगळुरूला निघालेल्या खासगी ट्रॅव्हलने समोर जात असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील अपघातात 6 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Sep 12, 2019, 9:45 AM IST

Updated : Sep 12, 2019, 11:22 AM IST

सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ खासगी बस व ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले असून जखमींना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील अपघातात 5 जणांचा मृत्यू

हेही वाचा - साताऱ्यातील नरवणे गावात १६४ वर्षांपासुन 'एक गाव एक गणपती' परंपरा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. यावेळी सातारा शहराजवळच्या डी-मार्ट समोर ट्रकचे टायर फुटले. ट्रकचालकाने ट्रकवर निंयत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. त्याचवेळी पुणेच्या दिशेकडून बेळगावकडे निघालेल्या (केए-01-एएफ-9506) या एस.आर.एस कंपनीच्या ट्रॅव्हल्सने (एमएच-43-बीपी-3127) या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रॅव्हलच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हेही वाचा - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू

या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हंकारे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर वाहतूक सेवा वळवण्यात आली आहे. तर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Intro:सातारा
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ खासगी बस व ट्रकच्या अपघातामध्ये सहा ठार झाले आहेत तर वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. याठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले असून जखमी व मृत व्यक्ती ना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Body:घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की पुण्यवरून बंगलोरला निघालेल्या लक्सरी ट्रॅव्हलने समोर जात असलेल्या ट्रेकला मागून धडक दिली आहे. हा अपघात एवढा मोठा आहे की ह्या मध्ये 5 जन ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Conclusion:
Last Updated : Sep 12, 2019, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.