सातारा - कोरेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार रमेश सदाशिव माने याला लाचखोरी प्रकरणी ४ वर्ष सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हा दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदही त्याला भोगावी लागणार आहे.
हेही वाचा - आरेवरुन आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने, स्थगितीचा निर्णय दुर्दैवी - फडणवीस
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल जाचहाटाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी हवालदार माने याने तक्रारकर्त्याकडे ३ हजारांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना ७ सप्टेंबर २०१५ रोजी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी गुन्ह्याचा तपास करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात न्यायालयाने रमेश माने यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
हेही वाचा - ..अखेर रश्मी ठाकरेंचं 25 वर्षांपूर्वीचं 'ते' स्वप्न पूर्ण