सातारा: स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील वेगवेगळ्या 3 ठिकाणी कारवाई करत बनावट आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा, 2 इनोव्हा कार आणि एक रिक्षा, असा 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक राजगोंडा पाटील (रा. शिरदवाड, ता. निपाणी, जि. बेळगाव), ललित सुमेरमल काछीया (रा. सुरूर, ता. वाई), तेजस अवघडे, आदित्य हरिश्चंद्र अवघडे, अनुष चिंतामणी पाटील आणि वैभव रवींद्र पावसकर (सर्व रा. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
3 ठिकाणी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सातारा जिल्ह्यातून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने वाई तालुक्यातील बावधन नाका येथे सापळा रचला होता. पहाटे सहाच्या सुमारास तेथे इनोव्हा कार (क्र. एम. एच. 12 ई. एम. 1883) आली. पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता गाडीत 5 लाख 75 हजार रूपये किंमतीचा गुटखा आढळला. त्यानंतर सुरुर फाटा (ता.वाई) येथे आणखी एका इनोव्हा कारमध्ये (क्र. एम. एच. 01 ए. एम. 4537) गुटखा आढळून आला. सातार्यातील चारभिंती येथे एका रिक्षामध्ये (क्र. एम. एच.11 सी. जे. 2505) 3 जण गुटख्याची वाहतूक करताना आढळले. त्यांनी एका चायनीज सेंटरमध्ये मशीनवर बनावट गुटखा तयार केल्याची कबुली दिली.
बनावट गुटखा तयार करण्याचे मशीन जप्त पोलिसांनी अन्न व औषथ प्रशासनाच्या अधिकार्यांना बोलावून घेत सातार्यातील तृप्ती चायनीज सेंटरवर छापा टाकला असता त्या ठिकाणी 2 लाख रुपये किंमतीची ब्लेंडीग आणि पॅकिंग मशीन आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. बनावट गुटखा बनवणारा वैभव पावसकर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वाई, भुईंज आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
या अधिकार्यांनी ही कारवाई केली पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अथीक्षक अजित बोर्हाडे, यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक मदन फाळके, हवालदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फड़तरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, वैभव सारवंत, सचिन ससाने, शिवाजी गुरव यांच्यासह अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली.