सातारा - नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा किल्ला सर केला. स्वत:च्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचा रणसंग्राम अजरामर केला. मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी कोंढाणा म्हणजेच आजच्या सिंहगडावरील रणसंग्रामाला व सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्र तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
हेही वाचा... तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा जत्था भारतात दाखल
अंधाऱ्या रात्रीची अवघड चढाई....
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा किल्ल्याची मोहीम बालसवंगडी तान्हाजी यांच्यावर सोपवली. स्वत:च्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत तान्हाजी मालुसरे सैन्यानिशी गुंजवणी नदी पार करत कोंढाणाच्या (सिंहगड) पायथ्याला येऊन पोचले. आजच्याच दिवशी म्हणजे ४ फेब्रुवारी १६७० रोजी मूठभर मावळ्यांनीशी अभेद्य असा कोंढाणा किल्ला, ते अत्यंत अवघड अशा द्रोणगिरी कड्याच्या बाजूने अंधाऱ्या रात्री चढले.
हेही वाचा... केरळमध्ये कोरोना राज्य आपत्ती म्हणून घोषित
तिप्पट सैन्याशी केला मुकाबला....
उदयभान राठोड व त्याच्या सुमारे १५०० हशमांच्या फौजेला अवघ्या ५०० मराठ्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत धूळ चारली. शत्रूशी बेभान होऊन लढताना या रणसंग्रामात हातातील ढाल पडल्यानंतरही शेला गुंडाळून लढणाऱ्या नरवीरांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला.
हेही वाचा... 'ही मुलाखत म्हणजे २ पोपटांची जुगलबंदी, मुख्यमंत्री अजित पवारांच्या दबावात'
तान्हाजींचे बलिदान सार्थकी...
उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी तान्हाजींचे बलिदान सार्थकी ठरवत किल्ला काबीज केला.
मराठी साहित्यविश्वात 'आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे' व 'गड आला पण सिंह गेला' हे दोन वाक्यप्रचार नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या अलौकिक कामगिरीमुळे अजरामर झाले. मालुसरे यांचे गाव असलेल्या गोडवलीचे ग्रामस्थ आज साडेतीनशे वर्षांनंतरही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृती हृदयात जपून आहेत.