कराड (सातारा) - तालुक्यात तब्बल 323 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच संपूर्ण तालुक्यात वादळी वार्याचाही जोर पहायला मिळत आहे. वार्यामुळे कराडमधील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील कोविड लसीकरण सेंटरवर झाडाची फांदी पडून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
तौक्ते चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी (काल) कराड तालुक्यात तब्बल 323 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच संपूर्ण तालुक्यात वादळी वार्याचा जोरही पहायला मिळतो आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वारा वाहतो आहे. ढगांच्या गडगडाटासह कराड शहर तसेच तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. रात्री उशीरापर्यंत वार्याचा आणि पावसाचा जोर होता. पावसामुळे विजापूर-गुहागर महामार्गासह पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मशागतीची कामे लांबणीवर पडणार आहेत. गेल्या चोवीस तासात कराड तालुक्यातील 13 मंडलांमध्ये तब्बल 323 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ LIVE Updates : रायगड जिल्ह्यात दाखल; कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू..