सातारा : जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात आज (25 एप्रिल) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास इर्टिका कारचा भीषण अपघातात झाला. यात 3 ठार तर 5 जण जखमी झाले.
मृतांमध्ये शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (वय 55), सागर सर्जेराव साबळे (वय 32) यांचा समावेश आहे.
हे सर्वजण मेरुलिंग येथून रेशनिंग आणण्यासाठी जात होते. या दरम्यान मेरुलिंग घाटातील एका वळणावर चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी पलटी झाली आणि घाटरस्त्यावर खोल दरीत कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. यामधील जखमींना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेढा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.