सातारा - महाबळेश्वरजवळ केळघर (ता. जावळी) येथील संतोष पांडुरंग पार्टी याला 23 किलो गांजा तस्करी करत असताना पोलादपूर पोलिसांनी अटक केली. कस्टम विभागातील पोलीस पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली.
संशयितांकडून लागला सुगावा
महाबळेश्वर-सातारा रोडवरील केळकर या गावात संतोष पार्टे सध्या वास्तव्यास आहे. यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी अन्य दोघांना गांजा विक्री करत असताना पकडले होते. यातून संतोष पार्टेचे नाव समोर आल्याने पोलिसांनी संतोषवर पाळत ठेवत त्याला जेरबंद केले. संतोष पार्टेसोबत आणखी गांजा तस्कर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर केळघर गावातील संतोष पांडुरंग पार्टे हा गांजा तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जावळीतील संशयित रडारवर
संतोष जावळी तालुक्यात आणखी कोणाकोणाला गांजाची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात सहभागी करून घेत होता हेदेखील या निमित्ताने समोर येणार आहे. जावळी तालुक्यातील आणखी गांजा विक्रेते कोण? त्याचीही पाळेमुळे शोधून असे महाभागदेखील आता या कारवाईमुळे सापडण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.