सातारा - जिल्ह्यात गेल्या २४ तासात 2 हजार 334 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 59 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
एकूण सव्वा लाख लोक कोरोनाबाधित -
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावळी 148 (5908), कराड 379 (18190), खंडाळा 171 (7590), खटाव 281(10717), कोरेगांव 149 (10335), माण 231 (7972), महाबळेश्वर 17 (3528), पाटण 91 (5061), फलटण 288 (16320), सातारा 424 (27816), वाई 140 (9179 ) व इतर 15 (685) असे आज अखेर एकूण 1 लाख 23 हजार 301 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जावळीत सर्वाधिक मृत्यू -
रविवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 18 (126), कराड 8 (503), खंडाळा 1 (97), खटाव 5 (294), कोरेगांव 3(260), माण 3 (162), महाबळेश्वर 0 (36), पाटण 1 (129), फलटण 2 (208), सातारा 13(839) व वाई 5 (233) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1516 नागरिकांना डिस्चार्ज -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1516 नागरिकांना घरी सोडण्यात आले.22 हजार 815 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.