ETV Bharat / state

भैरवगड परिसरातील चार वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, 123 कुटुंबांचे केले स्थलांतर

सातारा जिल्ह्यातील चार वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 123 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. या कुटुंबांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.

भैरवगडलगतच्या चार वाडयांना अतिवृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:35 PM IST

सातारा - भैरवगड जवळच्या टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या चार वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच येथील लोकांची भैरवगड व आसपासच्या गावांमधील घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

भैरवगडलगतच्या चार वाडयांना अतिवृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत
भैरवगडलगतच्या चार वाडयांना अतिवृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या टोळेवाडी वाड्याची जिल्हाधिकाऱयांनी पाहणी केली. भैरवगडांतर्गत येणाऱ्या टोळेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तेथील लोकांची घरे राहण्यायोग्य राहिली नाहीत. त्यांची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. चार वाड्यांमधील 123 कुटुंबांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.या स्थलांतरित लोकांसाठी आज (रविवार) जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. प्रशासनाकडून तसेच विविध संस्थाकडून मिळालेल्या वस्तुंचे वाटप भैरवगड येथे करण्यात आले. यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

चार वाड्यांमधील शेती आणि घरांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश-

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चार वाड्यांतील शेता आणि घरांचे लवकरात-लवकर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. अतिवृष्टी बाधीतांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करा. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी 24 तास आरोग्य पथक कार्यरत ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Intro:सातारा:- भैरवगड ता. सातारा या गावांतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी व गवळणवाडी या चार वाड्या येतात. या वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. मोठा अपघात होण्यापूर्वीच या लोकांची भैरवगड व आसपासच्या गावांमधील घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.Body:या अतिवृष्टी बाधितांना आज जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा केला आहे. प्रशासनाकडून गहू, तांदूळ व डाळ तसेच विविध संस्थाकडून मिळालेल्या वस्तुंचे वाटप आज भैरवगड येथे करण्यात आले. यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या टोळेवाडी वाड्याची जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली. यावेळी त्या म्हणाल्या भैरवगड गावांतंर्गत येणाऱ्या टोळेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यांची घरे राहण्या योग्य नसून त्यांची इतर घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. चार वाड्यांची 123 कुटुंबातील 589 नागरिकांचे तात्पुरती राहण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

(शेती व घरांचे पंचनामे तात्काळ करा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

भैरवगड ता. सातारा या गावाअंतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी व गवळणवाडी या चार वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या गावातील शेतीचे व घरांचे पंचनामे तात्काळ करा. अतिवृष्टी बाधीतांना सर्व सुविधा पुरवा. त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करा. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी 24 तास आरोग्य पथक कार्यरत ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.