ETV Bharat / state

माण तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला, ११ चारा छावण्यांना मंजूरी - camp

दुष्काळाचे भीषण वास्तव सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. या भीषण परिस्थितीत माणमधील पशुपालक २५ जानेवारीपासून चारा छावण्या चालू करण्याची मागणी शासनाकडे करत होते. पण, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे जनतेमधून नाराजीचा सूर होता.

चारा छावणी
author img

By

Published : Apr 4, 2019, 1:37 PM IST

सातारा - माण तालुक्यात अकरा चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित चार छावण्यांचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील, अशी माहिती पुरवठा विभागातून मिळाली आहे. चारा छावण्यांची मागणी नागरिकातून अनेक दिवसांपासून होत होती. या मंजुरीमुळे त्यांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.

चारा छावण्यात शेतकरी आपली जनावरे आणत आहेत

दुष्काळाचे भीषण वास्तव सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. या भीषण परिस्थितीत माणमधील पशुपालक २५ जानेवारीपासून चारा छावण्या चालू करण्याची मागणी शासनाकडे करत होते. पण, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे जनतेमधून नाराजीचा सूर होता. आता मार्च महिना उलटल्यानंतर माण तालुक्यात छावण्यांना मंजुरी दिली आहे.

चारा छावण्या मंजूर झालेल्या गावांमध्ये मलवडी, आंधळी, जाधववाडी, मोगराळे, बिजवडी, वडगाव, हवालदारवाडी, माळवाडी, वाकी, अनभुलेवाडी, शेनवडी या गावांचा समावेश आहे. पशुपालकांना या मंजुरीमुळे दिलासा मिळाला आहे. उर्वरित महसूल विभागात चारा छावण्या लवकर मंजूर कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Intro:सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अकरा चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्या आहेत. उर्वरित चार छावण्यांचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील अशी माहिती पुरवठा विभागातुन मिळाली आहे. दुष्काळाचे भीषण वास्तव जिल्ह्यामध्ये निर्माण झाली असताना चारा छावण्या मंजूर करण्यासाठी प्रशासना कडून दिरंगाई होत असल्यामुळे जनतेमधून नाराजीचे सूर होते. यावर प्रशासनाने जिल्ह्यात गंभीर दुष्काळ असणाऱ्या माण तालुक्यात छावण्यांना मंजुरी दिली आहे.

Body:यामध्ये मलवडी, आंधळी, जाधववाडी, मोगराळे, बिजवडी, वडगाव, हवालदारवाडी, माळवाडी, वाकी, अनभुलेवाडी, शेनवडी या गावात चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

पशुपालकांना या मंजुरीमुळे दिलासा मिळाला आहे. तसेच उर्वरित महसूल विभागात चारा छावण्या लवकर मंजूर कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या भीषण परिस्थितीत माण मधील पशुपालक 25 जानेवारीपासून चारा छावण्या चालू करण्याची मागणी शासनाकडे करत होते. मात्र मार्च महिना उलटल्यानंतर मंजुरी मिळाली आहे.

संग्रहित व्हिडिओ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.