सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 196 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 23 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
खटाव मध्ये सर्वाधिक रुग्ण
काल आलेल्या बाधितांमधे खटाव तालुक्यात सर्वाधिक 398 रुग्ण आढळले. तर जावळीत 31, कराड 133, खंडाळा 73, सातारा 185, कोरेगाव 163, माण 54, महाबळेश्वर 11, पाटण 51, फलटण 66, वाई 25 व इतर 6 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 75 हजार 788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 10 हजार 330 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 193 बाधित निघाले. बाधितांचा दर 11.58 टक्के इतका आहे.
13 हजार 905 रुग्ण ऍक्टिव्ह
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 2, कराड 3, कोरेगाव 2, माण 2, फलटण 1, खंडाळा 1, सातारा 12 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 13 हजार 905 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
तब्बल 2 हजार 736 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 736 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 57 हजार 944 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.
हेही वाचा - कृष्णा साखर कारखान्याकडून दोनशे रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर