सांगली - उत्तर प्रदेश मध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीचे संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटले आहेत, युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर उतरून टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी उत्तरप्रदेश सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवक काँग्रेसने राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा - अबू आझमी
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील हाथसर या ठिकाणी पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेचे संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटले आहेत. सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारच्या निषेधार्थ शहरातल्या काँग्रेस कमिटी समोर युवक काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. यावेळी उत्तर प्रदेश आणि योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शहर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश