ETV Bharat / state

जतमधील कोसारीत तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू, मृत सांगोला तालुक्यातील - Shankar Sambhaji Bhajanavale death

मृत शंकर संभाजी भजनावळे कोसारी येथे राहणाऱ्या मामाकडे तो कामाला होता. गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबतची फिर्याद मामा रावसाहेब हेगडे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली होती. शोधाशोध केली असता शनिवारी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील हेगडेवस्तीतील विहिरीत शंकरचा मृतदेह आढळून आला.

जतमधील कोसारीत तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू

author img

By

Published : Aug 1, 2020, 10:47 PM IST

जत (सांगली) - तालुक्यातील कोसारी येथील शंकर संभाजी भजनावळे (वय 22) या तरूणाचा विहिरीत पडल्याने बुडून मुत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली.. घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत शंकर संभाजी भजनावळे याचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील कडलास हे आहे. कोसारी येथे राहणाऱ्या मामाकडे तो कामाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबतची फिर्याद मामा रावसाहेब हेगडे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली होती. शोधाशोध केली असता शनिवारी कोसारी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हेगडेवस्ती येथील विहिरीत शंकर याचा मृतदेह आढळून आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हाक्के करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.