ETV Bharat / state

Year Ender 2021 Sangli : सांगली जिल्ह्यातील सरत्या वर्षातील महत्त्वाच्या 11 घटनांचा आढावा - MLA Gopichand Padalkar vs NCP Shivsena

सांगली जिल्ह्यात राजकीय ते कला क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. सांगली महापालिकेच्या सत्तांतरापासून आणि महापुरा व कोरोनाचे पुन्हा संकट अशा परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याची वाटचाल राहिली आहे. जाणून घेऊ, या घटना.

जिल्ह्यातील अविस्मरणीय घटनांचा आढावा
जिल्ह्यातील अविस्मरणीय घटनांचा आढावा
author img

By

Published : Dec 31, 2021, 6:58 PM IST

सांगली - 2021 या वर्षात सांगली जिल्ह्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. या वर्षभरातील जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.

  1. महापौर निवडणुकीत भाजपाची सत्ता उलथवून टाकत आघाडीने काबीज केले महापालिका ( Mahavikas Aghadi power in Sangli corporation ) - सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाला कलाटणी देणारी महापालिकेतील सत्तांतर संपूर्ण राज्यात चर्चेत राहिले. भाजपची सत्ता सांगली महापालिकेत होती. मात्र महापौर निवडीच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी एकत्रित येत भाजपची सत्ता उलथवून टाकली. सांगली महापालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर म्हणून निवडून आले. त्यामुळे भाजपच्या सत्तेला आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसला. जयंत पाटील यांनी महापौर आणि उपमहापौर निवडीच्या निमित्ताने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती.
    सांगली महानगरपालिका
    सांगली महानगरपालिका
  2. शिवप्रतिष्ठान संघटनेत उभी फूट, चौगुले यांनी काढली नवी संघटना ( Nitin Chaugule divide Shivpratishthan org ) - संभाजी भिडे हे संस्थापक असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा गृहकलह समोर आला. गेल्या अकरा वर्षांपासून काम करणारे नितीन चौगुले यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये उभी फूट पडल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाले. नितीन चौगुले यांनी संभाजी भिडे यांच्या संघटनेला आव्हान देत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या संघटनेची स्थापना केली. नितीन चौगुले हे भिडे हे यांचे कट्टर समर्थक आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यामध्ये अग्रभागी सहभागी झाले होते. मात्र, त्यांच्या निलंबनानंतर आणि नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे अखंड हिंदुत्ववादाचा झेंडा घेऊन कार्यरत असणाऱ्या शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.
    संभाजी भिडे
    संभाजी भिडे
  3. 87 कोरोना रुग्णांना तडफडून मारणारी डॉक्टर जाधव टोळी गजाआड ( Dr Mahesh Jadhav Sangli scam ) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरजेतील अपेक्स केअर सेंटर या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रारr दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. व्हेंटिलेटर नसताना दाखवून उपचार करण्याबरोबर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश जाधव यासह रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, जाधव यांचा डॉक्टर भाऊ ,आणखी एक डॉक्टर व एजंट अशा 15 जणांना अटक केली.
    आरोपी डॉक्टरांचे रुग्णालय
    आरोपी डॉक्टरांचे रुग्णालय
  4. महापुराने पुन्हा कृष्णाकाठ बुडवला, कोट्यवधीचे नुकसान ( Flood in Sangli during July 2021 ) - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाबरोबर महापुराचा मोठा तडाखा बसला. सांगली शहरासह कृष्णाकाठ हा महापुराच्या विळख्यात पुन्हा एकदा बुडाला. वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना महापूर आला. त्यामुळे अनेक गावे बुडाली. सांगली शहराचा ग्रामीण भागातील जवळपास दोन लाखाहून अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. बचावकार्यासाठी सैन्यदेखील दाखल झाले होते. या महापुरामुळे नागरिकांच्यासह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच शेकडो लोकांचे संसार उद्धवस्त झाले.
    जिल्ह्याला पुराचा फटका
    जिल्ह्याला पुराचा फटका
  5. शहरात घुसला बिबट्या, सांगलीकरांचे दणाणले धाबे - सांगली शहरामध्ये 31 मार्च रोजी बिबट्या शिरल्याची घटना समोर आली. राजवाडा चौक या ठिकाणी या बिबट्याने एका कुत्र्याला ठार मारत पटेल चौकाकडे जाणाऱ्या एका पडक्या इमारतीमध्ये घुसून अडगळीच्या ठिकाणी लपून बसला होता. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण शहर हादरुन गेले होते. वनविभागाकडून हा बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून राजवाड्याचे परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. तसेच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोल्हापूर येथून विशेष पथक बोलाविण्यात आले. त्याचबरोबर प्राणिमित्र आणि इतर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबटयाला पकडण्यात यश आले. वन विभागाकडून या बिबट्याला बंदुकीद्वारे बेशुद्धचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर बिबट्या बेशुद्ध होताच वन विभागाने या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करत ताब्यात घेत जंगलात सोडून देण्यात आले होते.
    बिबट्या
    बिबट्या
  6. क्रांतिवीरांगना हौसाबाई पाटील काळाआड ( Freedom fighter Hausabai Patil ) - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचे 23 सप्टेंबर 2021 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योती मालावली. स्वातंत्र्य लढ्यात हौसाबाई यांचे मोलाचे योगदान राहिले. स्वातंत्र्यसैनिकांना गनिमी काव्याने जेवण पुरवण्याबरोबर शस्त्रास्त्र पुरवणे आणि ब्रिटिश सरकारच्या बद्दल माहिती पुरवण्याची कामगिरी त्या बजावत असत. क्रांतिवीरांगना म्हणून त्यांची ओळख होती.
    क्रांतिवीरांगना हौसाबाई पाटील
    क्रांतिवीरांगना हौसाबाई पाटील
  7. सावळजच्या खुर्च्या पोहोचल्या थेट इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये! - इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये सापडलेल्या खुर्च्या तासगावच्या सावळज येथील बाळू लोखंडे या मंडप व्यावसायिकांच्या आहेत. या खुर्च्या मॅन्चेस्टरमधील एका हॉटेलबाहेर अगदी थाटात बसण्यासाठी वापरल्या जात आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संपूर्ण देशभरात या खुर्च्यांची एकच चर्चा सुरू झाली. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी थेट मॅंचेस्टरमधून हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे जवळच्या एका खेड्यातल्या खुर्च्या तिथे पोहोचल्या कशा? याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
    सावळजच्या खुर्च्या पोहोचल्या मँचेस्टरमध्ये

  8. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव - सर्वपक्षीय आघाडीची सत्ता असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जनता महा विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. सहकारात राजकारण नको, अशी भूमिका घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध झाली होती. मंत्री जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या एकजुटीने भाजपाच्या विरोधात निवडणूक लढविण्यात आली. महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव करत 21 जागांपैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवित जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्चस्व मिळविले. भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जतचे आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला. तर अध्यक्षपदाचा आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
    जिल्हा मध्यवर्ती बँक
    जिल्हा मध्यवर्ती बँक
  9. दोन युवतींसह तिघांची एकाच वेळी आत्महत्या - तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे तीन जणांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये एका युवकासह दोन युवतींचे मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Three Bodies Shekoba hill in Manerajuri) विषारी औषध पिऊन ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर या मृतदेहांच्या जवळ चॉकलेट्स आणि पुष्पगुच्छही आढळून आले. मात्र, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
  10. आमदार पडळकर आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटात तुफान राडा ( MLA Gopichand Padalkar vs NCP Shivsena ) -भाजप आमदार गोपीचंद पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आटपाडी या ठिकाणी राडा झाला. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर या घटनेमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमधून हा प्रकार घडला. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. दरम्यान या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सांगली पोलीस अधीक्षक निश्चित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक काम मनीषा डुबूले या तिघांनी कट रचून आपल्यावर हा सुनियोजित हल्ला केल्याचा आरोप केला.
  11. देशी जुगाड, दुचाकीचे इंजिन आणि भंगारातील साहित्यापासून बनवली चारचाकी जीप गाडी ( Dattatray Lohar Vehicle in social media ) - सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार या फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या कारागिराने आपल्या मुलाच्या इच्छेखातिर कल्पक बुद्धीने अत्यंत लहान चार चाकी गाडी बनवली आहे. दुचाकीचे इंजिन आणि भंगारातील साहित्य या सर्वांचा वापर करत एक टुमदार जुगाड गाडी तयार केली आहे. पेट्रोलवर धावणारी आणि किकवर मारून सुरू होणारी ही गाडी असून या गाडीचा लुक हा जीपप्रमाणे आहे. ताशी 45 किलोमीटर आणि प्रति लिटर 45 किलोमीटर मायलेज आणि चौघे बसण्याची क्षमता व लेफ्ट हॅन्ड ड्रायव्हिंग या गाडीचे वैशिष्ट्य आहे. या गाडीची बातमी सर्वात आधी 'ईटिव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. सोशल मीडियावर या जुगाड गाडीची चलती सुरू झाली. थेट महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीदेखील लोहार यांच्या जुगाड गाडीचे कौतुक केले. याशिवाय त्यांच्या जुगाड गाडीच्या बदल्यात नवी कोरी बोलेरो गाडी देण्याची ऑफर महिंद्रा यांनी जाहीर केली. मात्र लोहार दांम्पत्यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानत ही आमची लक्ष्मी असल्याचे म्हटले. त्यामुळे दुसरी गाडी बनवून देऊ. पण गाडीची अदला-बदल नको,अशी भाबडी भावना लोहार दाम्पत्याने व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.