ETV Bharat / state

कृष्णामाई कोपू नको..ओटी भरत महिलांनी घातले कृष्णा नदीला साकडे

दरवर्षी जून महिन्यात कृष्णाकाठी बुरुड समाजातील महिला एकत्र येऊन कृष्णा नदीला अंबिल वाहून त्याची पूजा करत खना-नारळाणी कृष्णा नदीची ओटी भरतात. तसेच 'कृष्णामाई कोपू नको' असे साकडे घालतात.

women-worshiped-krushna-river-sangali
ओटी भरत महिलांनी घातले कृष्णा नदीला साकडे
author img

By

Published : Jun 19, 2020, 3:47 PM IST

सांगली - विधिवत पूजा करत कृष्णानदीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. बुरुड समाजाच्यावतीने प्रतिवर्षी कृष्णा नदीची पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोनाची छाया असतानाही बुरुड समाजातील महिलांनी एकत्र येऊन ही पुजा केली.

संथ वाहते कृष्णामाई, अशी सांगलीच्या कृष्णा नदीची ओळख आहे. मात्र, पावसाळ्यात पूर येऊन कृष्णामाई कोप पावते. गेल्यावर्षी आलेल्या महापुराने अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली होती. यावर्षी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडू नये, यासाठी शेकडो वर्षांपासून सांगलीतील बुरुड समाजाच्यावतीने कृष्णामाईची खना-नारळांनी ओटी भरण्याची परंपरा आहे. सांगलीत शेकडो वर्षांपूर्वी महापूर आल्यानंतर कृष्णामाईला शांत करण्यासाठी त्यावेळच्या पटवर्धन सरकारांनी कृष्णानदीची पूजा करण्याची विंनंती बुरुड समाजाला केली आणि त्यांनतर ही प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून बुरूड समाजाच्यावतीने ही प्रथा पाळण्यात येत आहे.

ओटी भरत महिलांनी घातले कृष्णा नदीला साकडे

दरवर्षी जून महिन्यात कृष्णाकाठी बुरुड समाजातील महिला एकत्र येऊन कृष्णा नदीला अंबिल वाहून त्याची पूजा करत खना-नारळाणी कृष्णा नदीची ओटी भरतात. तसेच 'कृष्णामाई कोपू नको' असे साकडे घालतात. या पूजेनंतर प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी वनभोजनाचा आस्वादसुध्दा घेतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.