ETV Bharat / state

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अन्याय,अत्याचार कमी होतात - विजया रहाटकर

author img

By

Published : Jul 11, 2019, 8:36 AM IST

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, की तिच्यावरील अन्याय व अत्याचार कमी होतात, त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. त्याचबरोबर त्यांना महिला बचत गटात सहभाग घेतला पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.

महिलांना मार्गदर्शन करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

सांगली- महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, की तिच्यावरील अन्याय व अत्याचार कमी होतात, त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. यासाठी बचत गट हे उत्तम पर्याय असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. सांगलीमध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सक्षमीकरण प्रज्वाला उपक्रमांतर्गत महिला बचत गटातील महिलांसाठी कायदे, सामाजिक-आर्थिक जनजागृती मेळावा आज सांगलीमध्ये पार पडला. या मेळाव्याला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विजया रहाटकर यांनी आज जगात महिलांच्या बाबतीत सगळ्यात कडक कायदे भारतात असून या कायद्यांची देशातील महिलांना जाणीव नाही. त्यामुळे महिलांमध्ये या कायद्यांच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी महिला आयोग विविध माध्यमातून प्रयत्न करित आहे. तसेच महिलांनीही हे कायदे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत रहाटकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास त्यांच्यावर अन्याय, अत्याचार कमी प्रमाणात होत असतात, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य सरकारकडूनही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने उज्वला योजना सुरू करण्यात आल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातूनच महिला सक्षमी होऊ शकतात, त्यामुळे महिलांना बचत गट योजनेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.

या मेळाव्यात महापालिकेच्या महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी व पालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

FEED SEND FILE NAME - mh_sng_02_mahila_melava_vis_1_7203751 - to - mh_sng_04_mahila_melava_vis_1_7203751

स्लग - महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अन्याय,अत्याचार कमी होतात - विजया रहाटकर.

अँकर - महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर तिच्यावर अन्याय,अत्याचार कमी होतात,त्यामुळे महिला सक्षम झाली पाहिजे आणि यासाठी बचत गट हे उत्तम पर्याय असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.सांगली मध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.Body:व्ही वो - महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण प्रज्वाला उपक्रमांतर्गत महिला बचत गटातील महिलांच्यासाठी कायदे, सामाजिक-आर्थिक जनजागृती मेळावा आज सांगली मध्ये पार पडला. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.या प्रसंगी महापालिकेच्या महापौर संगीता खोत,आमदार सुधीर गाडगीळ,महापालिका आयुक्त नितीन कापडणीस,पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा,यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी व पालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विजया रहातकर यांनी आज जगात महिलांच्या बाबतीत सगळ्यात कडक कायदे हे भारतात आहेत.मात्र देशातील महिलांना या कायद्याची पूर्ण माहिती नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे महिलांच्या मध्ये या कायद्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी महिला आयोग विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे.तसेच महिलांनीही हे कायदे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे मत रहाटकर यांनी व्यक्त करत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास त्यांच्यावर अन्याय अत्याचार कमी प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातूनच उज्ज्वला योजना आज सुरू करण्यात आली आहे.आणि महिला बचत गटाच्या माध्यमातूनच महिला सक्षम होऊ शकतात, त्यामुळे महिला बचत गटांनी योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे.अस मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.

बाईट - विजय रहाटकर - अध्यक्ष, राज्य महिला आयोग,महाराष्ट्र.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.