सांगली - केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात सांगलीत महिलांनी निदर्शने करत या कायद्याला कडाडून विरोध दर्शवला. मंगळवारी सायंकाळी सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील पुतळ्यासमोर समस्त मुस्लीम आणि दलित समाजाच्या महिलांनी एकत्र येत सरकारच्या या दोन कायद्यांना विरोध केला आहे.
हेही वाचा - 'बोलायचे एक आणि करायचे एक यामुळेच भाजप विरोधी बाकावर'
हा कायदा सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः मुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सांगली मिरजेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, केंद्र सरकारने एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा, अशी मागणी करत पुढील तीन दिवस याठिकाणी साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.