ETV Bharat / state

पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, प्रसंगी टोकाचा संघर्ष करू - राजू शेट्टी

author img

By

Published : Aug 31, 2019, 7:48 PM IST

हा मोर्चा विश्राम बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू. त्यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

आंदोलन करताना नागरिक

सांगली - प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू. त्यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना घेऊन सरकार विरोधात आज सांगलीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मोर्चाबाबत माहिती देतना माजी आमदार राजू शेट्टी

हा मोर्चा विश्राम बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानीचे नेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्यासह हजारो पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, आज पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये सरकार दिरंगाई करत आहे. पण प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळाली पाहिजे. आम्ही प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू आणि यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी बोलताना पुरातील नुकसान खूप मोठे आहे. मात्र, सरकारला याचे गांभीर्य कळले नाही आणि पूरग्रस्तांच्याबाबतीत सरकारची संवेदनशीलता दिसून येत नाही, अशी टीका कदम यांनी केली आहे.

.....या आहेत मागण्या

पूरग्रस्तांना देण्यात येणारी उर्वरित दहा हजार रुपयांची रक्कम तातडीने देणे, ज्या नागरिकांची घरे पडलीत त्यांना तातडीने निवारा शेड उभे करून राहण्याची सोय करून देणे, पुरात बुडालेल्या सर्व शेतीवरील कर्ज माफ करणे, कर्ज न काढलेल्या शेतकऱ्यांना सर्व पिकांवर १ लाख रुपये अनुदान देणे, घरे पडलेल्यांना ५ लाख रुपये देणे, ज्यांची जनावरे मृत झाली व वाहली अशांना ५० हजारांची मदत देणे, व्यापाऱ्यांना नुकसानीनुसार आर्थिक मदत देणे, अश्या मागण्या करण्यात आल्या.

त्याचबरोबर, प्राप्तिकर व जीएसटीमध्ये सवलत देणे, विद्यार्थ्यांची फी माफ करणे, वीज बिल माफ करणे, सर्व वीज मोटारींची नुकसान भरपाई करणे, वीज पोल व तारांचा खर्च शासनाने करणे, शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज पुरवठा करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई करणे, तसेच चारा छावण्यांची मुदत वाढविणे, दुष्काळग्रस्त भागातील सर्व तलाव भरून देणे, पाणी योजनांच्या पंप गृहांची उंची वाढविणे, फायनान्स, मायक्रो फायनान्स बँका यांच्या वसुली तत्काळ थांबविणे आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:
File name - mh_sng_03_purgrast_akrosh_morcha_vis_01_7203751- mh_sng_03_purgrast_akrosh_morcha_byt_06_7203751

स्लग - पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू,प्रसंगी टोकाचा संघर्ष करू-आक्रोश मोर्चाद्वारे राजू शेट्टींचा इशारा...

अंकर - प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू,आणि यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना घेऊन सरकार विरोधात आज सांगलीत काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा वेळी ते बोलत होते.
Body:सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेस आमदार विश्वजीत कदम शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वाभिमानीचे नेते विशाल पाटील,राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्यासह हजारो पूरग्रस्त नागरिक,शेतकरी,व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगलीच्या विषयांबाबत चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला पूरग्रस्तांना देण्यात येणारी उर्वरित दहा हजार रुपयांची रक्कम तातडीने द्यावी,ज्या नागरिकांची घरे पडलेत,त्यांना तातडीने निवारा शेड उभे करून राहण्याची सोय करावी,पुरात बुडालेल्या सर्व शेतीवरील कर्ज माफ करा, कर्ज न काढलेल्या शेतकऱयांना सर्व पिकांना 1 लाख रुपये अनुदान द्या, घरे पडलेल्यांना 5 लाख रुपये द्या,मृत वा वाहून गेलेल्या जनावराना 50 हजाराची मदत द्या,व्यापाऱ्यांना नुकसानीनुसार आर्थिक मदत द्या, इनकम टॅक्स व जीएसटी मध्ये सवलत द्या, विद्यार्थ्यांची फी माफ करा, वीज बिल माफ करा,सर्व वीज मोटारीची नुकसान भरपाई द्या, वीज पोल व ताराचा खर्च शासनाने करावा, शेतकऱयांना नवीन कर्ज पुरवठा तातडीने द्या, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्या ,तसेच चारा छावण्याची मुदत वाढवा,दुष्काळग्रस्त भागातील सर्व तलाव भरून घ्या,पाणी योजनांच्या पंप गृहांची उंची वाढवा फायनान्स मायक्रो फायनान्स बँका यांच्या वसुली तात्काळ थांबवा आदीसह अन्य मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना आज पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदती मध्ये सरकार दिरंगाई करत आहे, पण प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळाली पाहिजे,आणि
प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू,आणि यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा शेट्टी यांनी दिला.

बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार. स्वाभिमानी शेतकरी संघटना.

तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बोलताना पुरातील नुकसान खुप मोठे आहे,पण सरकारला याचे गांभीर्य कळले नाही,आणि पूरग्रस्तांच्याबाबतीत सरकारची संवेदनशीलता दिसून येत नाही.
अशी टीका कदम यांनी केली आहे.

बाईट - विश्वजित कदम - आमदार, काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.