ETV Bharat / state

जलसंवर्धनाला संवेदनशील बाब म्हणून पाहणे गरजेचे - मिरजकर

ईटीव्ही भारतच्या 'करूया संकल्प जलसंवर्धनाचा' उपक्रमांतर्गत मिरजेतील 'सर्वोदयचा महाराजा' या गणेश मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे.

जलसंवर्धनाकडे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे, असे मत मिरजच्या नागरिकांनी व्यक्त केले
author img

By

Published : Sep 7, 2019, 3:47 PM IST

सांगली - जलसंवर्धनाकडे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे, असे मत मिरजच्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्रत्येकाने स्वत:पासून पाणीबचतीची सुरुवात करून जलसंवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

ईटीव्ही भारतच्या 'करूया संकल्प जलसंवर्धनाचा' उपक्रमांतर्गत मिरजेतील 'सर्वोदयचा महाराजा' या गणेश मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे.

जलसंवर्धनाकडे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे, असे मत मिरजच्या नागरिकांनी व्यक्त केले

पावसाळ्यातही जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी तसेच मिरज तालुक्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना अस्तित्वात आहेत. मात्र, या योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने गावांपर्यंत योजनेचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. दोन लाखांहून अधिक लोकांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.

अशा परिस्थितीत पाण्याची बचत कशी केली पाहिजे, याबाबत ईटीव्ही भारताच्या 'करूया संकल्प जलसंवर्धन' या मोहिमेअंतर्गत मिरजकर जनतेच्या मनात काय हे जाणून घेतले...

पाणी जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले. यामध्ये विनाकारण गाड्या धुणे, तसेच साठवून ठेवलेले पाणी फेकून देण्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेही गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Intro:
file name - mh_sng_01_jalsanvardhan_sankalp_7203751

स्लग - जलसंवर्धन,संवेदनशील बाब म्हणून पाहणे गरजेचे - मिरजकर नागरीक...

अँकर - जलसंवर्धन करने ही संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे आणि पाणीबचतीचे सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून केली पाहिजे,असे मत सांगलीकर जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. ईटीव्ही भारतच्या "करूया संकल्प जलसंवर्धनाचा" या उपक्रमांतर्गत सांगलीच्या मिरजेतील सर्वोदयचा महाराजा या गणेश मंडळ येथील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..

Body:व्ही वो - राज्य प्रमाणात सांगली जिल्ह्यात ही दुष्काळाची मोठी झळ दरवर्षी असते,जिल्ह्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळाशी दोन हात करत पाण्यासाठी वणवण भटकत असतो, पावसाळ्यात ही जत, कवठेमहांकाळ,खानापूर,आटपाडी,तालुक्यासह मिरजेचा पूर्वभाग याठिकाणी पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावं लागतं, जिल्ह्यातील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी म्हैसाळ,ताकारी,टेंभू सिंचन योजना अस्तित्वात आहेत,मात्र या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत,त्यामुळे जिल्ह्यातल्या शेवटच्या गावांपर्यंत योजनेचे पाणी अद्याप पोहोचलेलं नाही,पर्यायी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक लोकांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर सध्या सध्याच्या घडीला आली आहे.अशीच परिस्थिती दरवर्षी असते,अनेक वाड्या-वस्त्या गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ येते,तर शेतकऱ्यांनाही शेतीसाठी पाणी मिळत नाही,त्यामुळे पिकं करपून जातात.अशी जिल्ह्याची पाणीटंचाईची परिस्थिती आहे.

आणि अशा या परिस्थितीमध्ये पाण्याची बचत कशी केली पाहिजे,याबाबत ईटीव्ही भारताच्या "करूया संकल्प जलसंवर्धन" या मोहिमेअंतर्गत मिरजकर जनतेच्या मनात काय हे जाणून घेतले.यावेळी
पाणी जलसंवर्धन ही आज काळाची गरज आहे,आणि पाणी बचत करण्यासाठी खरेतर प्रत्येकांनी पुढे यायला पाहिजे,आपल्यापासून या पाणी बचत करण्याची सुरुवात केली पाहिजे.त्यामध्ये विनाकारण गाड्या धुणे,त्याचबरोबर साठवून ठेवलेलं पाणी फेकून देण्यात येतं,या बाबतीत विचार केला पाहिजे.तसेच रेन हार्वेस्टिंग प्रत्येक नागरिकांनी करणे गरजेचे आहे.त्याच बरोबर पाणी बचत करणे हे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे,असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.