ETV Bharat / state

चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम, पूरामुळे वारणेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - chandoli dam

चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण
author img

By

Published : Aug 2, 2019, 10:38 AM IST

सांगली - शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणातून 4200 क्यूसेकचा पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात आला आहे. धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण 'ओव्हरफ्लो'

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर, गेल्या 24 तासात याठिकाणी अतिवृष्टी झाली असून १३० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 87 टक्के धरण सध्या भरले आहे, तर दुसऱ्या बाजूला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरण प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारपासून सुरू केला आहे.

धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले, असून धरणाच्या मुख्य दरवाजातून 2500 क्यूसेक आणि धरणाच्या वीज निर्मितीवर रेडीयाल गेटमधून 1700 असा एकूण 4 हजार 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तर धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Av

Feed send file name - mh_sng_04_chandoli_dam_water_discharge_vis_1_7203751 - to- mh_sng_04_chandoli_dam_water_discharge_byt_5_7203751

स्लग - चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम,धरणातून 4200 क्यूस्केस पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ..

अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणातुन 4200 क्यूस्केस पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात येत आहे.धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उचलण्यात आले आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Body:सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून धुंवादार पाऊस पडत आहे.तर गेल्या 24 तासात याठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.१३० मिलिमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.87 टक्के धरण सध्या भरली आहे.तर दुसऱ्या बाजूला धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार कायम असल्याने धरण प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग आज पासून सुरू केला आहे.धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले, असून धरणाच्या मुख्य दरवाजातुन 2500 क्यूसेक्स आणि धरणाच्या वीज निर्मिती वर रेडीयाल गेट यामधून 1700 असा एकूण 4 हजार 200 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.तर धरणातुन करण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बाईट - अभियंता,चांदोली धरण,शिराळा.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.