सांगली - ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावरील काँक्रेट बेड नुकसानग्रस्त झाला आहे. यामुळे चार चाकी वाहनांसाठी वाहतूक बंद आहे. तर दुचाकीवाल्यांनाही जीवाची कसरत करत प्रवास सुरू आहे.
पावसाळ्यात नागरिकांचे हाल -
सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा दुवा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर येथे साखर कारखाना व शिक्षण संस्था आहेत. तर वाळवा तालुक्यातील 21 गावातील विद्यार्थी व साखर कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज या पुलावरुन चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, पावसाळ्यात या पुलावर पाणी आले की कामगार व विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते.
मागील वर्षी पुलावर मोठ खड्डे पडल्याने बेड काँक्रेटचे काम करण्यात आले होते. मात्र, मागील आठवड्यात आलेल्या महापुराचे पाणी पुलावर आले आणि साईटच्या संरक्षण पाईप व बेड काँक्रेट नुकसानग्रस्त झाला.
हेही वाचा - बापरे.. शस्त्रक्रिया करून एक महिन्याच्या बाळाच्या पोटातील काढला गर्भ ! नवजात बाळाला जीवदान