सांगली - पंढरपूरहून आषाढीवारी संपून परतत असणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला तासगाव तालुक्यातील मनेराजुरी या ठिकाणी ( Warakari Tempo Accident ) अपघात झाला आहे. शिराळा तालुक्यातील असणाऱ्या दिंडीतील 10 वारकरी ( 10 Warakari injured ) यामध्ये जखमी झाले आहेत. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी ( Accident due to reversal of tempo ) होऊन हा अपघात घडला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी सांगली, मिरजच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीसाठी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भागाईवाडी परिसरातील सुमारे 60 वारकरी गेले होते. विठ्ठल दर्शन झाल्यानंतर या वारकऱ्यांची दिंडी गाडीतून आपल्या गावी शिराळा या ठिकाणी परतण्यासाठी सोमवारी सकाळी निघाली होती.
हेही वाचा - Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हजारो साई भक्त शिर्डीत दाखल
कवठेमंकाळ- तासगाव मार्गे येत असताना मनेराजुरी येथील पवार वस्ती जवळ गाडी पोहोचली असता,एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. ज्यामध्ये टेम्पोतील असणारे वारकरी हे एकमेकांच्या अंगावर पडले. त्याचबरोबर काही वारकरी गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. तर, इतर वारकरी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या 10 वारकऱ्यांना तातडीने सांगली, मिरज, तासगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - Ashadi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हिंदू बांधवांसाठी मुस्लिम समाजाची अशीही 'कुर्बानी'