ETV Bharat / state

जतमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - भिवर्गी द्राक्ष उत्पादन न्यूज

शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. अवकाळी पाऊस, वादळ यांमुळे हाता-तोंडाशी आलेले पीक गमवावे लागते. सांगलीतील जत तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

Vineyards
द्राक्षबाग
author img

By

Published : Mar 13, 2021, 11:01 AM IST

सांगली - द्राक्ष बागांसाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जत तालुक्यातील भिवर्गी येथील शेतकरी काशिनाथ मल्लाप्पा सुतार यांची बाग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे सुतार यांचे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जतमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त झाली

तीन एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त -

शेतकरी काशिनाथ सुतार यांची भिवर्गी फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत जमीन आहे. तिथे त्यांनी पाच एकर 'थॉमसन सिडलेस' वाणाची द्राक्ष लावली आहेत. त्यापैकी तीन एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. एकशे वीस दिवस पूर्ण असलेले सुमारे 55 टन द्राक्ष काढणीसाठी तयार झालेले होते. बाजारभावाप्रमाणे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

बागेत वारा घुसल्याने नुकसान -

अचानक वादळी वारा बागेत घुसल्याने मांडवाचे तार तुटून खांब कोसळले. स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घेत सुतार यांनी द्राक्ष बाग जगवली होती. डोळ्यासमोर द्राक्ष बाग कोसळल्याने काशिनाथ सुतार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची परिस्थिती पाहता परिसरातील शेतकऱ्यांनी सुतार यांच्यासाठी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.