ETV Bharat / state

'कर्नाटक सीमेवर आमचं गाव म्हणून होतंय दुर्लक्ष', रस्त्याच्या मागणीसाठी शिंदेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. अशी तक्रार करत सातत्याने पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने मिरज तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदेवाडी गावातील जनतेचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Oct 13, 2019, 12:32 PM IST

सांगली - जिल्ह्यातील मिरज तालुका, या तालुक्यातील शिंदेवाडी हे गाव अगदीच कर्नाटक सीमेवर आहे. शिंदेवाडी गावातील गावकऱ्यांनी आपल्या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या शिंदेवाडी गावातील जनतेचा मतदानावर बहिष्कार

हेही वाचा... 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'

20 वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही आणि पाठपूरावा करून देखील रस्त्याचे काम झाले नाही, असे बोलत शिंदेवाडीतील ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हे गाव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि भाजपचे आमदार असलेल्या सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील आहे.

हेही वाचा... काँग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजपा हा संघटित डाकू- प्रकाश आंबेडकर​​​​​​​

मिरज तालुक्यातील शिंदेवाडी या गावातील रस्त्याची 20 वर्षांपासून दुरावस्था आहे. कर्नाटक सीमेवर हे गाव असून, येथील लोकसंख्या 650 इतकी आहे. पाऊस पडल्यानंतर याठिकाणी असणाऱ्या माने, कुवळे, पाटील, कदम, साळुंखे वस्ती या ठिकाणी जाणे रस्त्याअभावी मुश्किल बनते. रस्ता नसल्याने लहान मुलांना शाळेत जाताना, उपचारासाठी रूग्णांची ने आण करताना येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा... मानवी साखळीद्वारे चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती

रस्त्याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. आपले गाव कर्नाटक सीमेवर असल्याने असे होत असल्याचे गावकऱ्यांना वाटत आहे. अखेरीस आपल्या न्याय मागणीसाठी शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी आता निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे. याबाबत शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला तसे निवेदन देत, आधी रस्ता मग मतदान अशी जाहीर भूमिका घेतली आहे. राज्याचे सामजिक न्याय मंत्री व भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचा हा मतदारसंघ असून गेल्या 10 वर्षांपासून खाडे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

Intro:File name - mh_sng_03_election_bahishkar_vis_01_7203751 - mh_sng_03_election_bahishkar_byt_01_7203751

स्लग - रस्त्याच्या मागणीसाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मतदार संघातील गावाचा निवडणूकीवर बहिष्काराचा निर्णय ...

अँकर - 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत,असल्याने मतदानवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.भाजपाचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचा हा मतदारसंघ आहे.
Body:सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे गेल्या 20 वर्षांपासून रस्ता खराब आहे.कर्नाटक सीमेवर हे गाव असून,650 लोकसंख्या या गावात आहे.पाऊस पडल्यानंतर याठिकाणी असणाऱ्या माने,कुवळे,पाटील, कदम ,साळुंखे वस्ती याठिकाणी जाणे मुश्किलीचे बनते,सातत्याने या खराब रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन ,लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत.असा आरोप करत शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.याबाबत शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने निवेदन देत ,आधी रस्ता मग मतदान अशी भूमिका जाहीर केली आहे.भाजपाचे सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचा हा मतदार संघ असून गेल्या 10 वर्षांपासून खाडे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

बाईट - ग्रामस्थ. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.