ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला ! प्रकाश शेंडगेंना उमेदवारी ? - वंचित बहुजन आघाडी

मतदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकाश शेंडगे
author img

By

Published : Mar 30, 2019, 8:15 AM IST

सांगली - प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदार संघातला विद्यमान उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी जयसिंग शेंडगे यांच्या जागी जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकाश शेंडगे

सांगलीतून भाजपचा उमेदवार निश्चित झाला आहे. मात्र विरोधात कोण लढणार याबद्दल स्पष्टता नाही. आधी सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा तिढा होता, अखेर स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांची उमेदवारांच्या बाबतीतली चाचपणी सुरू आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, पाटील घराण्यातील विशाल पाटील की अन्य कोण ? यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खल सुरू आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र सांगली लोकसभेच्या निवडणुकीतील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकाश शेंडगे हे जयसिंग शेंडगे यांचे चुलत बंधू आहेत. धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून प्रकाश शेंडगे यांचे असणारे काम, यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही. वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळाल्यास या सरकारच्या विरोधात आपण लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

AVB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_29_MARCH_2019_VANCHITAAGHADI_UMEDVAR_BADAL_SARFARAJ_SANADI - TO -
R_MH_2_SNG_29_MARCH_2019_VANCHITAAGHADI_UMEDVAR_BADAL_SARFARAJ_SANADI

स्लग - बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला ! माजी आमदार प्रकाश शेंडगेंना उमेदवारी फायनल ?

अँकर - सांगली लोकसभेच्या निवडणूकीतील बदलते समीकरणामुळे.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला विद्यमान उमेदवार बदल्याण्याचा निर्णय घेतला आहे.या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.Body:व्ही वो - सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर झाला आहे.मात्र विरोधात कोणा याचा अजून घोळ सुरू आहे.आधी सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा तिढा होता,अखेर स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली आहे.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटने कडे सक्षम उमेदवार नसल्याने स्वाभिमानीने आणि उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी सुरू आहे.भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, घराण्यातील विशाल पाटील की अन्य कोण ? यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खल सुरू आहेत.तर वंचित बहुजन आघाडीकडून जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.मात्र सांगली लोकसभेच्या निवडणूकीतील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर वंचित
बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली मध्ये पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामुर्तब झाला आहे.
प्रकाश शेंडगे हे जयसिंग शेंडगे यांचे चुलत बंधू आहेत.धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातुन प्रकाश शेंडगे यांचे असणारे काम यामुळे त्यांची उमेदवारी फायनल करण्यात येणार असून शनिवारी याची अधिकृत घोषणा होणार आहे.तर प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही.वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळाल्यास या सरकारच्या विरोधात आपण लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे.तर प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.

बाईट - प्रकाश शेंडगे - माजी आमदार, सांगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.