ETV Bharat / state

सांगलीत दिवसभरात 252 कोरोनाबाधित वाढले; 9 रुग्णांचा मृत्यू - सांगली कोरोना केसेस लाईव्ह

सांगली जिल्ह्यात शनिवारी 252 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यात सर्वाधिक 180 सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत. सध्या जिल्ह्यात 2हजार 374 ॲक्टिव्ह रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या 4 हजार 448 झाली आहे.

Sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 9, 2020, 11:01 AM IST

सांगली - जिल्ह्यात शनिवारी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ कायम असल्याचे दिसून आले.दिवसभरात तब्बल 252 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 180 जणांचा समावेश आहे. 155 जण कोरोनामुक्त झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 374 ॲक्टिव्ह रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या 4 हजार 448 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी यामध्ये आणखी भर पडली. दिवसभरात उपचार घेणाऱ्या 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील 4, मिरज शहरातील 3 ,वाळवा तालुक्यातील बावची येथील 1 आणि कासेगाव येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे.

दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 252 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल 180 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.ज्यामध्ये सांगली शहरातील 133 आणि मिरज शहरातील 47 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण

१) आटपाडी तालुका -15

२) जत तालुका - 03

३) क.महांकाळ तालुका -07

४) मिरज तालुका -21

५) पलुस तालुका - 03

६) वाळवा तालुका - 07

७) तासगांव तालुका -03

८) शिराळा तालुका - 07

९) कडेगाव तालुका - 06

१०) खानापूर तालुका- 00

शनिवारी 155 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोना उपचार घेणारे 173 जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील 131 जण हे ऑक्सिजनवर तर 40 जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आणि हायफ्लो नेझुल ऑक्सिजनवर 02 उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 374 झाली आहे.तर, आता पर्यंत एकूण 4 हजार 448 कोरोना रुग्णांची नोंद झाली. शनिवारपर्यंत 1,938 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 136 जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी 12 हजार 822 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या 5 लाख 03 हजार 084 अशी झाली आहे. शनिवारी 11081 रुग्ण बरे झाले आहेत. 338362 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 147048 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.