सांगली - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आज विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल २१ जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सेविकांसह कर्मचारी तसेच गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत यशस्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा परिषद आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या हस्ते २१ जणांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, अर्जुन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते. गाव, वाडी आणि वस्त्यांवर आरोग्य विभागाच्या योजना पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम कर्मचारी करत आहेत. मागील काही वर्षापूर्वी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता. परंतू, चांगली सेवा देऊन आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याचे महत्वपूर्ण काम केले जात आहे.