सांगली - जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील १३ जणांचा समावेश आहे. १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.यामुळे सध्या ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या २५९ आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण ५६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८९ जण कोरोनामुक्त झाले आणि १४ जणांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे,बुधवारी आणखी २१ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील १३ जणांचा समावेश असून मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे १२ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोना लागण झालेले जिल्ह्यातील आजचे नवे कोरोना रुग्ण पुढील प्रमाणे, जत तालुक्यातील उमदी १,पलूस तालुक्यातील नागठाणे येथील १, कडेगाव तालुक्यातील सोनसळ १ आणि कडेगाव शहर १, वाळवा तालुक्यातील वाळवा येथील १,आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील २, शिराळा तालुक्यातील चरण येथील १ तर सांगली महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण आढळून आले असून यामध्ये सांगली शहरतील ९ आणि मिरज शहरातील ४ जणांचा समावेश आहे.