ETV Bharat / state

Turmeric Production In Sangli: सांगलीच्या हळदीकडे दुर्लक्ष! स्थानिक राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव; वाचा खास रिपोर्ट

author img

By

Published : Aug 2, 2022, 10:18 PM IST

Updated : Aug 3, 2022, 10:08 AM IST

हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. इथल्या बाजारपेठेने हळदीला जगामध्ये नाव मिळवून दिले. मात्र, इथल्या बाजारपेठेचा आणि हळदीच्या वाढीसाठी गेल्या दहा वर्षात फारसे प्रयत्न झाले नाहीत. पण दुर्गम असणाऱ्या हिंगोली येथे हळद संशोधन केंद्र मंजूर करून कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. ( Turmeric market In Sangli ) हा केवळ राजकीय फायदयासाठी निर्णय असून, तिथल्या राज्यकर्त्यांचं यश मानले जाते आहे. मात्र, जागतिक हळदीची बाजारपेठ असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांचे हळदीकडे दुर्लक्ष झाले हे तितकेच सत्य असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये हळदीचे गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जायचे. इथे पिकणारी राजापूर हळद हे जगप्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्याच्या वारणा आणि कृष्णाकाठी माती, पाणी आणि हवा या नैसर्गिक वातावरणामुळे इथल्या हळदीची गुणवत्ता मोठी आहे. त्यामुळेच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत हळदीची बाजारपेठ वसली गेली. ( Turmeric Market In Sangli ) तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हळदीच्या बाजारपेठ वाढीसाठी अधिकचे प्रयत्न केले. त्यामुळेच सांगलीची हळद जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. तसेच, देशातून हळद विक्रीसाठी शेतकरी सांगलीच्या बाजारपेठेत पोहोचत होते. आज देखील सांगलीच्या बाजारपेठेमध्ये स्थानिक आणि परपेठ अशा हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होते. नुकतंच इथल्या हळदीला जीआय मानांकन देखील मिळाले आहे.

इतर गोष्टींचा अभाव दिसून येतो - हळदीचे क्षेत्र, हळदीची बाजारपेठ यामुळे शासनाकडून हळद संशोधन केंद्र देखील या ठिकाणी सुरू करण्यात आले. मात्र, आता या हळद संशोधन केंद्राची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. कारण गेल्या दहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यातल्या हळद पिकाचे क्षेत्र वाढले नाही. नैसर्गिक कारण असो किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी हळद पिकाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तर, हळद संशोधन केंद्राकडे शेतकऱ्यांना खरंतर हळदीचा पिक आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन करण्याची जबाबदारी आहे. पण हे होताना इथल्या हळद संशोधन केंद्राकडे मनुष्यबळ किंवा इतर साधनसामग्री व इतर गोष्टींचा अभाव दिसून येतो. परिणामी
हळद क्षेत्र वाढलेले नाही.

इथले नैसर्गिक वातावरण हे उत्तम - सांगलीतील प्रसिद्ध हळद व्यापारी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष गोपाळ मर्दा, हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, हिंगोली सारख्या ठिकाणी हळदीचे क्षेत्र आणि हळदीचे उत्पादन वाढले याची प्रमुख दोन कारण आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी राजकीय पाठबळ आणि दुसरे म्हणजे हळदीचे उत्पादन खर्च कमी. यामुळे इथल्या शेतकऱ्यांपेक्षा हिंगोलीच्या परिसरातील शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळतो. पण गुणवत्तेच्या बाबतीत सांगलीची स्थानिक हळद गुणवत्तपूर्ण आहे. कारण की इथले नैसर्गिक वातावरण हे उत्तम आहे.

बागलकोट या जिल्ह्यातून हळद विक्रीसाठी दाखल - सांगलीच्या बाजारपेठेच्या विचार केला तर बाजारपेठेत वर्षाला 17 ते 18 लाख पोत्यांची आवक होते. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा याशिवाय कर्नाटकच्या विजयपूर, बेळगाव आणि बागलकोट या जिल्ह्यातून हळद विक्रीसाठी दाखल होते, त्याला स्थानिक हळद म्हटले जाते. तर निजामाबाद त्याचबरोबर जळगाव, नांदेड, बसमत, हिंगोली या भागातून येणाऱ्या हळदीला परपेठ हळद म्हणून ओळखले जाते.

हळद संशोधन केंद्र विकसित होणे गरजेचे - याठिकाणी असणारे हळदीचे पीक आणि गुणवत्ता पूर्ण हळदीचे उत्पादन व हळदीची बाजारपेठ पाहता, इथल्या हळद संशोधन केंद्र म्हणावे तितके विकसित झाले नाही, किंवा ते गांवखेड्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे हळद पिकाचे क्षेत्र वाढले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हळद संशोधन केंद्र विकसित होणे गरजेचे आहे. पण ते झाले नाही. हे होण्यासाठी त्यासाठी राजकीय पाठबळ आवश्यक आहे.

पिकांमध्ये आणखी प्रगती कशी करता येईल - गेल्या चार ते पाच वर्षांपासून हिंगोली आणि परिसरामध्ये हळदीचा क्षेत्र वाढले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हळदीचे पीक घेतले जाते. चार वर्षांमध्ये इथला शेतकरी आणि आसपासचा शेतकरी हळद विक्री तिथेच करू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एक बाजारपेठ हिंगोली येथे विकसित होऊ लागलेली आहे. हे होत असतानाही बाजारपेठ आणि इथल्या शेतकऱ्यांना स्थानिक आमदार, खासदार यांचे पाठबळ नक्कीच मिळाले आहे. इथल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये पिकांमध्ये आणखी प्रगती कशी करता येईल, यासाठी आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्र व्हावे, यासाठी पाठपुरावा केला आहे.

हेमंत पाटील या नेत्यांना त्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता - महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या संतोष बांगर यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत, हळद संशोधन केंद्र मंजूर देखील केला आणि यावर कडी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदार संतोष बांगर यांना पाठबळ म्हणून हळद संशोधन केंद्राल शंभर कोटींच्या निधीची तरतूद देखील केली आहे. त्या संशोधन केंद्राला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देखील देण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकरी आता निर्माण झाला आहे. याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संतोष बांगर आणि हेमंत पाटील या नेत्यांना त्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी हळद विक्रीसाठी - सांगली जिल्ह्यातील हळदीची बाजारपेठ येथे हळदीच्या क्षेत्र वाढले नाही, किंबहुना इथल्या हळद संशोधन केंद्राला सक्षम करण्यामध्ये इथले राजकीय नेते राज्यकर्ते कमी पडले, असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात हळदीचे मोठे उत्पादन घेतले जाते. म्हणूनच या ठिकाणी हळदीची बाजारपेठ देखील आज अस्तित्वात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी हळद विक्रीसाठी यायची. आता हळू त्याच्यामध्ये घट होऊ लागली आहे, असे जरी असले तरी हळदीला जगाच्या कानाकोपऱ्यात जगाच्या पाठीवर घेऊन जाण्याचे काम सांगलीच्या बाजारपेठेने केला आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये राज्यकर्त्यांनी हळद शेतकरी आणि हळद संशोधन केंद्राकडे कानाडोळा केला.

कोणीही हळदीची बाजारपेठ आणखी समृद्धी कशी होईल - सांगली जिल्ह्याला राज्याच्या आणि देशाच्या सत्तेमध्ये नेहमीच मोठी पदे मिळाली. मात्र, त्याचा उपयोग राज्यकर्त्यांनी सांगलीच्या हळदीला आणखी विकसित करण्यासाठी किंवा हळद उत्पादक शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी कधीच केला नाही. भाजपाचे सदाभाऊ खोत आणि काँग्रेसचे विश्वजित कदम हे कृषिराज्य मंत्री म्हणून काम पाहिले आहे,पण दोघांनी देखील किंबहुना जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय नेत्यांनी मग तो मंत्री असो, आमदार असो किंवा खासदार असो. कोणीही हळदीची बाजारपेठ आणखी समृद्धी कशी होईल, याकडे कधी पाहिले नाही. तसेच, इथले हळदीचे क्षेत्र वाढीसाठी हळद संशोधन केंद्र अधिक सक्षम गरजेचे होते. पण ते विकसित केले गेले नाही. वास्तविक त्याची मोठी गरज असताना, ती झालेली नाही. याला सर्वस्वी जबाबदार इथले राज्यकर्ते आहेत, असा आरोप देखील महेश खराडे यांनी केला आहे.

हेही वाचा - भारतीय महिला संघाने रचला इतिहास; लॉन बॉल्स स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पटकावले सुवर्णपदक

Last Updated : Aug 3, 2022, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.