जत (सांगली) - तालुक्यातील येळदरी येथील शेतातून घरी जात असताना म्हैसाळ कॅनाॅल शेजारील डबक्यात ट्रॅक्टर पलटी होऊन एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सुरज म्हाळाप्पा सरगर (वय 20) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे.
सुरज हा दिवसभर शेतात औषध फवारणी करत होता. सायंकाळी साडेसहा वाजता घरी जात होता. यावेळी येळदरी गावाच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर म्हैसाळ योजनेच्या कॅनाॅल शेजारील वळणावर डबक्यात ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला. यावेळी सागरसोबत असलेल्या त्याच्या लहान भावाने फोनवर या घटनेची माहिती घरच्यांना दिली.
दरम्यान, नातेवाईकांसह येळदरी गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्याला डबक्यातून बाहेर काढून जत शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात झाली. तर प्राथमिक तपास पोलिस नाईक कणसे करत आहेत.
ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू; जत तालुक्यामधील येळदरीतील घटना
सुरज हा दिवसभर शेतात औषध फवारणी करत होता. सायंकाळी साडेसहा वाजता घरी जात होता. यावेळी येळदरी गावाच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर म्हैसाळ योजनेच्या कॅनाॅल शेजारील वळणावर डबक्यात ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला