ETV Bharat / state

एकापाठोपाठ चांदोलीत भूकंपाचे तीन धक्के; नागरिक भयभीत - sangali

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराला एका मागोमाग सलग भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. हे ३.८ ते २.९ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के होते.

एकापाठोपाठ चांदोलीत भूकंपाचे तीन धक्के; नागरिक भयभीत
author img

By

Published : Jun 20, 2019, 6:00 PM IST

Updated : Jun 20, 2019, 6:57 PM IST

सांगली - एका मागोमाग सलग भूकंपाचे तीन धक्के बसल्याने जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हादरला आहे. सकाळच्या सुमारास ३.८ ते २.९ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के चांदोली परिसराला बसले.

गुरुवार सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का चांदोली परिसराला बसला. हा धक्का ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचे होता. हा कमी तीव्रतेचा धक्का असल्याने नागरिकांना फारसे काही जाणवले नाही. मात्र, दोन मिनिटांच्या अंतराच्या फरकाने पुन्हा एक 3.8 रेस्टर स्केलचा धक्का बसला. जो पहिल्या धक्क्यापेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का होता.

एकापाठोपाठ चांदोलीत भूकंपाचे तीन धक्के; नागरिक भयभीत

सलग दोन धक्के बसल्यामुळे नागरिक भयभीत होऊन आपल्या घराबाहेर पडले. हा धक्का थांबतो न थांबतो तोच लगेच ,पुन्हा ८ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास आणखी एक तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला, जो २.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed send file name - MH_SNG_BHUKANMP_20_JUNE_2019_VIS_1_7203751

स्लग - एकापाठोपाठ तीन भूकंपाच्या धक्क्याने चांदोली परिसर हादरला...

अँकर - शिराळा तालुक्यातला चांदोली परिसर आज एकापाठोपाठ बसलेल्या ३ भूकंपाच्या धक्क्याने हादरून गेला आहे. ३.८ ते २.९ इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के चांदोली परिसरात झाले आहेत. सकाळच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.Body:सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात भूकंपाचा तीन धक्के बसले आहेत.३.५ ,३.८ आणि २.९ रेस्टर स्केल तीव्रतेचे हे भूकंप होते.सकाळी सात नंतर साडेआठच्या दरम्यान येथील भुकंपाचे धक्के बसले आहेत.आज गुरुवार सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला,जो ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचे होता.कमी तीव्रतेच्या असलेल्या धक्क्याने नागरिकांना फारसं काही वाटलं नाही,मात्र दोन मिनिटाच्या अंतराच्या फरकाने पुन्हा एक 3.8 रेस्टर स्केलचा जो पहिल्या धक्क्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले
हा धक्का थांबतो न थांबतो तोच लगेच ,पुन्हा ८ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास आणखी एक तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला,जो २.९ रिश्टर स्केल इतकया कमी तीव्रतेचा होता.या वर्षात सलग तीन धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ असून या धक्क्यामुळे कोठेही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही ,शिवाय चांदोली धरणही सुरक्षित आहे.मात्र एका पाठोपाठ एक अशी तीन भूकंपाचे धक्के बसल्याने शिराळा तालुक्यात मात्र भितीचे वातावरण पसरले आहे.

Conclusion:
Last Updated : Jun 20, 2019, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.