सांगली : कधी-कधी चोरटे स्वतःहून पोलिसांच्या तावडीत सापडतात,असाच काहीसा प्रसंग आटपाडी तालुक्यातल्या पिंपरी खुर्द (Pimpri Khurd taluka) या ठिकाणी घडला आहे. एका चोरट्याने एक दुचाकी चोरली (Bike theft) आणि त्यानंतर तो त्याच्या पाहुण्यांना भेटायला ज्या गावी गेला,त्या गावातल्या एका सेवानिवृत्त जवानाची ती गाडी निघाली, मग गावकऱ्यांनी चोरट्याला आणि गाडीलाही पकडलं,व थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं.पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.मात्र या दुचाकी चोरट्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेची तालुक्यात खुमदार चर्चा झाली.
पिंपरी खुर्द (Pimpri Khurd) येथील सेवा निवृत्त जवान बाबासाहेब गणपत काटे हे पंधरा दिवसांपूर्वी कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून आटपाडी (Atpadi taluka)येथे गेले होते.यावेळी काटे यांनी आपली दुचाकी बसस्थानकात उभी केली. काही वेळाने चोरटाने त्यांची दुचाकी लंपास केली.याबाबत त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात (Atpadi Police Thane) चोरीची फिर्याद दाखल केली होती.त्यानंतर पोलिसांनी गाडीचा शोध घेतला,पण गाडीचा शोध लागला नाही.पण चोरीला गेलेली गाडी चोरट्यांनी थेट गावात आणुन दिली.
ज्या चोरट्याने गाडी चोरली होती, त्याचे पाहुणे पिंपरी खुर्द याठिकाणी राहतात, पाहुण्यांना भेटायला चोरटे काटे यांच्या गाडीवरून गावात पोहचले,गाडी गावात पोहचताच काटे यांची ही गाडी गावात प्रसिद्ध असल्याचे अनेकांनी ती पटकन ओळखली. तसेच काटे यांना माहिती मिळताच ते देखील तेथे पोहचले.आणि गाडी बाबत चौकशी सुरू केली. चोरट्यांना आपली चोरी पकडल्याचे लक्षात येताच एका चोराने जवळ असणाऱ्या डाळिंब बागेत पळून जाऊन लपून बसला.तर एकाला ग्रामस्थांनी पकडले,आणि पोलिसांनी याची माहिती देताच आटपाडी पोलिसांनी तातडीने हजर होऊन लपून बसलेल्या चोरट्यासह दोघा चोरट्यांना अटक केले आहे.
हेही वाचा : Nagpur Crime News : दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण, पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता
हेही वाचा : Aurangabad Crime : वैजापूर येथे कत्तलखान्यावर छापा, 6 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त हेही वाचा
हेही वाचा : hief Jumped Video : चोरी करायला गेलेल्या चोराची चौथ्या मजल्यावरुन उडी; उपचारादरम्यान मृत्यू